बिबट्याशी झुंज देत पतीचे प्राण वाचवणारी रणरागिनी...संजना पावडे यांच्या हिंमतीला सलाम! बिबट्याला ठोसे लगावून पत्नीने वाचविला पतीचा जीव मदतिल...
बिबट्याशी झुंज देत पतीचे प्राण वाचवणारी रणरागिनी...संजना पावडे यांच्या हिंमतीला सलाम!
बिबट्याला ठोसे लगावून पत्नीने वाचविला पतीचा जीव मदतिला सासरे
पाळीव कुत्र्याने घेतला बिबट्याच्या गळ्याचा चावा
दरोडी मधील पावडे कुटुंबाने दाखविले एकीचे बळ ;बिबट्याने ठोकली धुम
बिबट्याच्या जबड्यात घट्ट पकडलेले आपल्या पतीचे डोके मृत्यूचा दाढेत असतानाही पत्नीने हिंमत न हरता बिबट्याशी झुंज देत त्याला पिटाळून लावले व आपल्या पतीचा जीव वाचविला.बिबट्याच्या तावडीतून पतीला सहीसलामत सोडवत पतीला पत्नीने अक्षरशः पुनर्जन्मच दिला.बिबट्याचे पाय आणि शेपटी जोरात ओढत बाजुला काढत पत्नीने आधुनिक स्त्री असल्याची ओळख समाजाला करून दिली आहे.
याबाबत माहीती अशी की,डोंगराच्या कुशीत असणा-या दरोडी चापळदरा भागात गोरक पावडे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे (ता.२५) मध्यरात्री दोन च्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात आवाज येत असल्याने गोरक हे पाहण्यासाठी गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला गोरक यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केल्यानंतर पत्नी संजना यांनी गोठ्या कडे धाव घेतली त्यांच्यासोबत गोरक यांचे वडील दशरत व घरातील पाळीव कुत्रा देखील आला.
बिबट्याने गोरक यांचे डोके पकडले होते अक्षरशः मृत्य समोर त्यांना दिसत होता पत्नी संजना यांनी कशाचाही विचार न करता बिबट्याचे पाय व शेपटी जोरात ओढली वडील दशरथ यांनी मोठा दगडचा तुकडा बिबट्याला मारला व पाळीव कुत्र्याने आपला मालकासाठी बिबट्याच्या गळ्यापशी जोराचा चावा घेतला यामुळे बिबट्याला जीव वाचविण्यासाठी धूम ठोकावी लागली रविवारी दिवसभर या थरारक घटनेची दरोडीच्या शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती.
या घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन पुढील उपचारासाठी गोरक पावडे यांना नगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बिबट्याने समोर पती गोरक यांचे डोके पकडलेले पाहीले मी कशाचाही विचार न करता त्याचे दोन्ही पाय व शेपटी जोरात ओढली तरीही तो त्यांना सोडत नव्हता सासरे दशरथ यांनी दगडाचा मोठा तुकडा त्याच्या अंगावर मारला व पाळीव काळ्या नावाचा आमचा कुत्रा त्यानेही त्याला गळ्यापाशी चावा घेतला त्यानंतर तो भांबावून गेला व तेथुन पळ ठोकला
संजना पावडे (दरोडी)