वेब टीम : मुंबई राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी...
वेब टीम : मुंबई
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर यथेच्छ आगपाखड केल्यानंतर आज अधिवेशनाचा पहिला दिवस देखील तेवढाच वादळी ठरला.
आधी राज्यपालांना सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीमुळे अभिभाषण आटोपतं घ्यावं लागलं आणि नंतर विरोधकांनी सभागृहात नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी नारेबाजी केली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बुधवारी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळ परिसरातून बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. नेमकं झालं काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षांच्या बैठकीसमोर बोलताना भाजपावर परखड टीका केली. “३० वर्ष सापाच्या पिलाला दूध पाजलं, ते वळवळ करत होतं, आता आमच्यावरच फुत्कारतंय”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपाला सुनावलं.
तसेच, “तुमच्यात हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाही तुम्ही? पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग तुम्ही दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही?” असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.