आर आर पाटील यांची प्रतिमा निलेश लंके मध्ये : आमदार अमोल मिटकरी गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी काम करणारे नेतृत्व कान्हूर पठार येथे १० कोटी ९५ लक...
आर आर पाटील यांची प्रतिमा निलेश लंके मध्ये : आमदार अमोल मिटकरी
गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी काम करणारे नेतृत्व
कान्हूर पठार येथे १० कोटी ९५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन..
कान्हूर पठारला होणार शिवस्मारक..
आमदार अमोल मिटकरी यांनी केली निधीची घोषणा..
पारनेर/प्रतिनिधी (गणेश जगदाळे):
तालुक्यातील कान्हूर पठार येथे आमदार निलेश लंके यांच्या विकास निधीतून १० कोटी ९५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार निलेश लंके हे उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की आमदार निलेश लंके यांनी विकास कामांची तालुक्यात गंगा आणली असून दुष्काळी पारनेर तालुक्याची ओळख पुसण्याचे ते काम करत आहेत निलेश लंके यांनी भाळवणी येथे कोरोना काळात शरद चंद्रजी पवार साहेब आरोग्य धाम उभे करून आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेची सेवा केली त्यांचे ते समाज हिताचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे. तसेच यावेळी बोलताना मिटकरी पुढे म्हणाले की निलेश लंके सारखे एक सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व निश्चित राष्ट्रवादीमध्ये आर आर पाटील यांची उणीव भरून काढत आहे. त्यांच्यामध्ये आपल्या सर्वांना आर आर पाटलांची प्रतिमा दिसते तसेच त्यांचे सुरू असलेले कार्य हे आम्हा सर्वांना प्रेरणा देणारे आहे. पवार साहेबांनी निलेश लंके यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने पारनेरला एक हिरा दिला आहे. त्याची तुम्ही सर्वांनी जपवणूक करा.
यावेळी मा. सभापती सुदाम पवार, जिल्हा बँक संचालक काकासाहेब तापकीर, ज्ञानदेव पांडुळे मामा, मा. उपसभापती गंगाराम बेलकर, मा. पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी माहिती तंत्रज्ञान अध्यक्ष जितेश सरडे, तंत्रज्ञान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे विभागीय अध्यक्षा संध्या सोनावणे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा राजेश्वरी कोठावळे, मारुती रेपाळे, सरपंच ऍड. राहुल झावरे, बापू शिर्के, सैनिक बँक चेअरमन शिवाजी व्यवहारे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे,
मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठाण कार्याध्यक्ष दीपक आहेर, बाळासाहेब खिलारी सर, कैलास लोंढे, नगरसेवक भाऊ चौरे, जाणता राजा प्रतिष्ठाण अध्यक्ष किरण ठुबे, वीज वितरण पारनेर तालुका कमिटी अध्यक्ष व कोरठण खंडोबा देवस्थान विश्वस्त चंद्रकांत ठुबे, अर्जुन व्यवहारे, प्रसाद नवले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे प्रसाद कर्नावट, जलक्रांतीचे प्रणेते अब्बास मुजावर, विलास महाराज लोंढे, संभाजी नरसाळे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष परांडे, अभयसिंह नांगरे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी कान्हूर पठार येथील समस्त ग्रामस्थ व तालुक्यातील विविध भागांतून आलेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कान्हूर पठारला एक कोटीच्या अभ्यासिकेचे भूमिपूजन..
कान्हूर पठार भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी या उद्देशाने पारनेर तालुक्याचे आमदार लोकनेते निलेश लंके यांनी एक कोटी रुपयांची स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मंजूर केली व तिचे भूमिपूजन विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते कान्हूर पठार येथे करण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेच्या फायदा होणार आहे. आमदार निलेश लंके यांनी अभ्यासिका मंजूर केल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.
पठार भागावरील पाण्याचा प्रश्न सोडवणारच : आमदार निलेश लंके
कान्हूर पठार येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की कान्हूर पठार हा दुष्काळी पट्टा असून एक टीएमसी पाण्याचा प्रश्न लवकर सोडणार असून व पठार भागावर पाण्याच्या संदर्भातील योजना राबविण्यासाठी मी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. पाणी प्रश्नावर काम करून पठार भागाचा चेहरामोहरा आपण नक्कीच बदलू असे यावेळी ते म्हणाले
पठार भागावर पाणी परिषद भरवा : किरण ठुबे
आमदार निलेश लंके यांनी पठार भागावरील पाण्याच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पठार भागावर एक मोठी पाणी परिषद घ्यावी त्यामाध्यमातून पठार भागावरील पाणी प्रश्नासंदर्भात काम करण्यास योग्य दिशा मिळेल. अशी मागणी जाणता राजा प्रतिष्ठान चे अध्यक्ष किरण ठुबे यांनी आपल्या भाषणात केली.
कान्हूर पठारला होणार शिवस्मारक..
कान्हूर पठारला लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणार असून विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ग्रामस्थांनी शिवस्मारकाची मागणी केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी दहा लाख रुपये त्यांच्या निधीतून स्मारकाला देण्याचे यावेळी जाहीर केले. त्यामुळे कान्हूर पठारला लवकरच शिवस्मारक होणार असून ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देत आनंद व्यक्त केला.