वडगाव दर्या सेवा सोसायटी पदाधिकारी निवडी बिनविरोध सोसायटीवर सुभाष परांडे यांचे एक हाती वर्चस्व पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील पठार भागावरील...
वडगाव दर्या सेवा सोसायटी पदाधिकारी निवडी बिनविरोध
सोसायटीवर सुभाष परांडे यांचे एक हाती वर्चस्व
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील पठार भागावरील महत्त्वपूर्ण समजली जाणारी वडगाव दर्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची निवड प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली चेअरमन व व्हा. चेअरमन पदाधिकारी निवडी ही बिनविरोध झाल्या. चेअरमन पदी बाळकृष्ण सहादु परांडे व्हा चेअरमन पदी पंढरीनाथ किसन परांडे यांच्या निवडी बिनविरोध झाल्या.
पोपट परांडे,दत्तात्रेय परांडे, तुकाराम परांडे(माजी सरपंच), समाजसेविका अलकाताई झरेकर, अर्जुन गुंड (माजी सरपंच) यांच्या मार्गदर्शनाखाली ,अपक्ष ग्रामपंचायत सदस्य सुभाष परांडे यांची वडगाव दर्या वि. वि. का. सोसायटीवर एकहाती सत्ता आली.
यामध्ये सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये बाळासाहेब परांडे(तंटामुक्ती अध्यक्ष वडगाव दर्या), नवनाथ परांडे, सुनील परांडे यांनी विशेष प्रयत्न केले. नवनिर्वाचित संचालक म्हणून बाळकृष्ण परांडे, पंढरीनाथ परांडे, भगवान झरेकर, सुनील परांडे, नवनाथ परांडे, बाळासाहेब परांडे, अंकुश परांडे, यांची निवड झाली.
सोसायटी वर एकहाती विजय मिळून ग्रामपंचायत सदस्य सुभाष परांडे यांनी गावात युवा आदर्श निर्माण केला असून पुढील वाटचाली साठी संचालक मंडळ व चेरमन,व्हा.चेरमन यांना शुभेच्छा दिल्या व गावामध्ये सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ होणार आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न व समस्या आता मार्गी लागणार असून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत असे सांगितले.
प्रस्थापितांना सुभाष परांडेची धोबीपछाड; सेवा सोसायटी घेतली ताब्यात...
पठार भागावर वडगाव दर्या सारख्या ग्रामीण भागातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वडगाव दर्या ग्रामपंचायत मध्ये प्रस्थापितांना शह देत. अपक्ष उमेदवारी करत सर्वाधिक मतांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत सुभाष परांडे यांनी करिश्मा केला होता. आता सेवा सोसायटीच्या निवडणुकीतही त्यांनी एक हाती वर्चस्व मिळवत सात जागा निवडून आणत चेअरमन व व्हा चेअरमन पदावर सर्वसामान्य घरातील उमेदवारांना संधी दिली आहे. त्यांचे पठार भागावरील संघटन कौशल्य यामधून दिसून आले असून भविष्यात पठार भागावरील राजकारणामध्ये सुभाष परांडे सारख्या युवा चेहऱ्याला नक्कीच चांगले दिवस असतील.