सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज... राष्ट्रवादीचे पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी याच्या विरोधात गुन्हा दाखल पारनेर/प्रतिनिधी : पारनेर नगरपंचायतीचे...
सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज...
राष्ट्रवादीचे पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी याच्या विरोधात गुन्हा दाखल
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी याने अभियंता सचिन राजभोज यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांनी पारनेर पोलिस ठाण्यात विजय सदाशिव औटी याच्या विरोधात शिवीगाळ व मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल केला.
नगराध्यक्ष विजय औटी काही नगरसेवकांसह पारनेर शहराला पाणीपुरवठा संदर्भात काल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बरोबर चर्चा करत होते.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या मोटारी किती आहेत, याची माहिती मागवली. अनेकदा माहिती मागूनही अभियंता राजभोज यांनी ती दिली नाही. यावरून दोघांत वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.
औटी याने राजभोज यांना मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकाराची राज्यभर चर्चा झाली. मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांनी याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पारनेर नगरपंचायत कार्यालयामध्ये पाणीपुरवठा अभियंता सचिन बाळकृष्ण राजभोज हे शासकीय कामकाज करीत असताना त्यांना पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी याने मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ केली त्यानंतर मारहाण करत धमकी दिली. सहायक निरीक्षक राजेश काळे पुढील तपास करत आहेत.