कर्जुले हर्या येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी डॉ. आंबेडकर यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे : संजीवनी आंधळे पारनेर/प्रतिनिधी : भार...
कर्जुले हर्या येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
डॉ. आंबेडकर यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे : संजीवनी आंधळे
पारनेर/प्रतिनिधी :
भारतरत्न विश्वगुरू महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती करणाऱ्या येथे साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना सरपंच संजीवनी आंधळे म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून त्यांनी केलेले समाज कार्य हे नक्कीच आपणा सर्वांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या माध्यमातून दीनदलित दुबळ्या समाजाला न्याय मिळाला असून त्यांनी केलेले कार्य हे समाजाला पुढे घेऊन आले आहे आपण सर्वांनी कोणत्याही महापुरुषांना धर्माच्या व जातीच्या चौकटीत न पाहता त्यांना सामाजिक वैचारिक दृष्टीने पाहणे व वाचणे गरजेचे आहे.
कर्जुले हर्या येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावातील ग्रामस्थ तसेच सरपंच संजीवनी आंधळे, उपसरपंच मिनीनाथ शिर्के माजी सरपंच साहेबराव वाफारे बाबाजी आंधळे, कर्जुले हर्या ग्रामपंचायत सदस्य दुर्गात आंधळे, अर्चना आंधळे, जाधव साहेब व इतर सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.