अडीच तोळ्याचे लॉकेट केले परत निघोज येथील लाँड्रीचालकाचा असाही प्रामाणिकपणा पारनेर प्रतिनिधी : निघोज येथील गणराज लाँड्रीचे मालक संदीप ईधाटे...
अडीच तोळ्याचे लॉकेट केले परत निघोज येथील लाँड्रीचालकाचा असाही प्रामाणिकपणा
पारनेर प्रतिनिधी :
निघोज येथील गणराज लाँड्रीचे मालक संदीप ईधाटे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यात सापडलेले सव्वा तोळ्याचे सोन्याचे लॉकेट परत केले. संदीप ईधाटे हे गेली दहा वर्षांपासून लाँड्रीचा व्यवसाय करीत आहेत. कुणाचेही कपडे आल्यानंतर ते कपडे स्वच्छ करण्याअगोदर खिशामध्ये काही कागदपत्रे किंवा किमती वस्तू आहेत का, याची चौकशी करतात.
गेली दोन दिवसांपूर्वी निघोज सोसायटीचे नूतन संचालक संतोष लामखडे हे त्यांच्याकडे कपडे घेऊन गेले. त्यांनी कपड्याची उचकापाचक केल्यानंतर एका खिशात अडीच तोळ्याचे लॉकीट पाहिले. ईधाटे यांनी लामखडे यांना फोन करून ते अडीच तोळ्याचे लॉकीट परत दिले. सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे लॉकीट इमानदारीने परत केल्याबद्दल ईधाटे यांचे सर्वत्र कौतुक आहे.