गंजपीर देवस्थान हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान : सुजीत झावरे पाटील पवळदरा येथील गंजपीर देवस्थानचा यात्रा उत्सव यात्रा उत्सवादरम्यान शेलार म...
गंजपीर देवस्थान हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान : सुजीत झावरे पाटील
पवळदरा येथील गंजपीर देवस्थानचा यात्रा उत्सव
यात्रा उत्सवादरम्यान शेलार मामांची झाली आठवण
पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळे) :
पवळदरा येथील गंजपीर देवस्थानच्या विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध असेल विकासात्मक काम करून देवस्थानला एक चांगली ओळख निर्माण करून देणार आहे या ग्रामीण भागातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून गंजपीर देवस्थान हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असून तीर्थक्षेत्र विकास निधीतून पाठपुरावा करून येथील प्रश्न सोडवणार आहे. अशी प्रतिक्रिया सुजित झावरे पाटील यांनी गंजपीर देवस्थान यात्रा उत्सवानिमित्त उपस्थित राहत व्यक्त केली. यावेळी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने सुजीत झावरे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील पोखरी येथील पवळदरा येथे गंजपीर बाबा यात्रा उत्सव दि. ८ ते ११ एप्रिलदरम्यान संपन्न झाला या यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या यात्रा उत्सवादरम्यान परिसरातील जवळजवळ पन्नास हजारापेक्षा जास्त भाविकांनी हजेरी लावत गंजपीर येथे येत दर्शन घेतले. गंजपीर बाबा हे अतिशय जागृत देवस्थान असून हिंदू-मुस्लीम तसेच सर्व धर्मियांचे हे श्रद्धास्थान आहे.
दरम्यान यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कुस्ती स्पर्धा तसेच लोकनाट्य तमाशा झाले येथील स्थानिक ग्रामस्थांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
दरम्यान सुजीत झावरे पाटील यांनी यापूर्वीही देवस्थानच्या विकासासाठी हातभार लावला असून देवस्थानला भेट दिल्यानंतर त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करत व पथदिवे (हायमॅक्स) यावेळी भेट दिले.
यावेळी यात्रा उत्सव कमिटीचे सदस्य पोखरी पवळदरा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच ज्येष्ठ नेते निजाम पटेल, युवा नेते सतीश पवार, उपसरपंच परशुराम शेलार, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे, नामदेव करंजेकर, तंटामुक्ती अध्यक्ष विकास शिवले, आनंदा केदार, विठ्ठल फरतारे, मा. सरपंच सोपान फरतारे, युवा नेते संतोष शेलार, अन्सार पटेल, अमीन पटेल, अशोक खैरे, पोपट कसबे, साहेबराव करंजेकर, मुन्ना सय्यद, रफिक पटेल, उंबर पटेल, यशवंत जाधव, तुषार पवार, शिवम पवार, सादिक शेख, पप्पू पटेल, मन्सूर पटेल, अकबर पटेल आदी उपस्थित होते.
शेलार मामांची झाली आठवण..
गंजपीर देवस्थानच्या विकासासाठी व गंजपीर यात्रा उत्सव हा राज्यात पोहोचला पाहिजे ही भावना ठेवून काम करत असलेले यात्रा उत्सव कमिटीचे प्रमुख तुळशीराम शेलार मामा यांचे गेल्या वर्षी कोरोना मुळे दुःखद निधन झाले. यावर्षीच्या यात्रा उत्सवामध्ये त्यांची उणीव भासत होती यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की आज खऱ्या अर्थाने शेलार मामांची मला आठवण होत असून या देवस्थानच्या विकासासाठी त्यांनी जे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे ते आपण विसरू शकत नाही.
सुजित झावरे यांच्या माध्यमातून विकास कामे मार्गी..
गंजपीर देवस्थानची सुजित झावरे यांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विकासकामे मार्गी लागली असून देवस्थानला ते नेहमी सहकार्य करत असतात देवस्थानच्या परिसरातील वीज रस्ते पाणी या सुविधा झावरे यांनी मार्गी लावल्या देवस्थान परिसरातील अनेक प्रश्न मार्गी लावल्या मुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. देवस्थान परिसरातील विकासासाठी यापुढील काळात मी कटिबद्ध आहे असे सुजीत झावरे पाटील म्हणाले...