राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सदस्यपदी गणेश आहेर आमदार निलेश लंके यांच्या हस्ते निवडीचे पत्र पारनेर प्रतिनिधी : खडकवाडी ये...
राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सदस्यपदी गणेश आहेर
आमदार निलेश लंके यांच्या हस्ते निवडीचे पत्र
पारनेर प्रतिनिधी :
खडकवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आमदार निलेश लंके यांचे एकनिष्ठ सहकारी गणेश आहेर यांची नुकतीच अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. असून त्यांना निवडीचे पत्र पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाने यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
गणेश आहेर ही विविध सामाजिक कामांच्या माध्यमातून खडकवाडी व परिसरामध्ये कार्यरत आहे. जिल्हा कार्यकारणी सामाजिक न्याय विभागाच्या सदस्यपदी त्यांची निवड झाल्याने खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका खऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. आमदार निलेश लंके यांनी यावेळी गणेश आहेर यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी संतोष नेवाळे आंबी दुमला सरपंच जालिंदर गागरे सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष टपाल साहेब यावेळी उपस्थित होते.
गणेश आहेर यांच्या निवडीबद्दल खडकवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मी काम करत असताना समाजाचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करेल आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार आहे.
गणेश आहेर (जिल्हा कार्यकारणी सदस्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग अहमदनगर)