राष्ट्रवादीने दावा केलेल्या ढोकी सेवा सोसायटीवर अखेर शिवसेनेची सत्ता तालुक्यातील बहुतांश सेवा सोसायट्या शिवसेनेकडे : रामदास भोसले पारनेर प्र...
राष्ट्रवादीने दावा केलेल्या ढोकी सेवा सोसायटीवर अखेर शिवसेनेची सत्ता
तालुक्यातील बहुतांश सेवा सोसायट्या शिवसेनेकडे : रामदास भोसले
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील ढोकी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासाहेब नऱ्हे तर व्हा. चेअरमनपदी शंकर धरम यांची निवड झाली आहे.सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना प्रणित जय हनुमान सहकार मंडळाने ११ जागा
जिंकत बहुमत मिळविले होते. चेअरमन व व्हा.चेअरमन पदांच्या निवडीसाठी सहाय्यक निबंधक गणेश औटी यांच्या अध्यक्षतेखाली नुतन संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी बाबासाहेब नऱ्हे व अशोक धरम यांनी तर व्हा. चेअरमन पदासाठी शंकर धरम व पोपट वाकचौरे यांनी अर्ज दाखल केले होते.चेअरमन पदासाठी झालेल्या निवडीत बाबासाहेब नऱ्हे
तर व्हा.चेअरमनपदासाठी शंकर धरम हे प्रत्येकी ८ मते मिळवून विजयी झाले.
युवा नेते कैलास नऱ्हे, माजी सरपंच भाऊसाहेब मोरे, बापू मोरे, बाबासाहेब नऱ्हे, शिवाजी धरम, बापू नऱ्हे, रावसाहेब नऱ्हे, संदीप नऱ्हे, किसन खटके, रामदास नऱ्हे, प्रवीण धरम, बाबासाहेब धरम, ऋषी धरम, साबुद्दिन पठाण, वसीम पठान, बापू गायकवाड, गोरख मोरे, आबा वाकचौरे, प्रवीण नऱ्हे, मारुती धरम, संपत धरम, एकनाथ धरम, भाऊ भुसारी, लहानु धरम, नामदेव भुसारी, भास्कर नऱ्हे, आप्पा नऱ्हे, संतोष खटके, आप्पा खटके, रामदास नऱ्हे, भगवान खटके, भाऊसाहेब धरम, निलेश खटके,दिनकर खटके, रावसाहेब धरम, राहुल नर्हे, संतोष धरम, किसन धरम, प्रशांत धरम, रामा चितळकर, राजू मोरे, विजय खटके, सचिन नऱ्हे, प्रवीण नऱ्हे, हमिद पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार विजयराव औटी, जि.प.सभापती काशीनाथ दाते सर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, महिला आघाडी प्रमुख प्रियांका खिलारी, युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके युवासेना उपतालुका प्रमुख शुभम टेकुडे, युवा सेना विभाग प्रमुख अक्षय गोरडे यांनी
अभिनंदन केले आहे.
तालुक्यामध्ये श्रेय वादाचे राजकारण सुरू आहे. परंतु अलीकडे झालेल्या बहुतांश सेवा सोसायट्यांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला असून शिवसेना पक्षच तालुक्यात आजही मोठा पक्ष आहे सोसायटया ताब्यात आल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी माजी आमदार विजयराव औटी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक कटिबद्ध आहे.
रामदास भोसले
(उपजिल्हा प्रमुख शिवसेना)