उन्हाळी कांद्याला योग्य भाव मिळावा सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे यांची मागणी पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातही मोठ्या प्रमाणामध्ये का...
उन्हाळी कांद्याला योग्य भाव मिळावा
सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे यांची मागणी
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातही मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे उत्पादन होत असते तसेच आता बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भावात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे आधी ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचं चित्र आहे. कांद्याला सध्या २ रुपये ते ८ रुपयांचा दर मिळत आहे. कांद्याला शासनाणे विचार करून योग्य तो हमीभाव दिला पाहिजे अशी मागणी यावेळी वडगाव सावताळ येथील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर व समस्यांवर लढणारे सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे यांनी मुख्यमंत्र्यांना मेल द्वारे पत्र लिहून आहे.
दरम्यान कांद्याच्या बाबतीत मागील वर्षाचा अनुभव पाहता यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले आहे आणि त्याची सर्वत्र काढणी सुरू आहे. तसेच कांदा साठवण क्षमतेला मर्यादा असल्याने उरलेला कांदा बाजारात आणण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही, पण बाजारात मिळत असलेला भाव पाहता शेतकऱ्यांना यंदा उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत कांद्याची विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे. असे मत यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे यांनी व्यक्त केले.
अतिवृष्टी आणि आवकाळीच्या असमानी संकटात शेतकरी सापडत आहे. महावितरणाच्या लोडशेडिंग आणि खतांच्या दरवाढीच्या सुलतानी संकटाचा शेतकरी सामना करत आहे. त्यातच आता हाती आलेल्या पिकाला कवडीमोल भाव भेटत असल्याने लावलेलं खर्चही निघणं अवघड झाले आहे. असे मतही मोहनराव रोकडे यांनी व्यक्त केले.