मोहनराव रोकडे सच्चा दिलदार मित्र पारनेर प्रतिनिधी : अजातशत्रू असलेले व्यक्तिमत्व निखळ मैत्री जपणे, मित्र परिवार जमा करणे, सुख दुःखात मित्र ...
मोहनराव रोकडे सच्चा दिलदार मित्र
पारनेर प्रतिनिधी :
अजातशत्रू असलेले व्यक्तिमत्व निखळ मैत्री जपणे, मित्र परिवार जमा करणे, सुख दुःखात मित्र परिवाराला मदत करणारे मोहन सुभाष रोकडे वडगांव सावताळमधील सामान्य कुटूंबातले व्यक्तीमत्व असले तरी आपल्या लाघवी व गोड स्वभावाने या माणसाने फार मोठा मित्र परिवार महाराष्ट्रात निर्माण केला आहे.
निव्वळ निकोप मैत्री जपणे हा त्यांचा स्थायीभाव. सुख दुःखात गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणे व संकटात मदत करणे हा त्यांचा स्वभाव, त्यामुळेच त्यांच्या मित्र परिवार जाल तेथे पहावयास मिळतो. नम्रतेच्या जोरावर संभाषण व संवाद कौशल्याने अनेक राजकीय पक्षातही त्यांचा मित्र परिवार आहे. सर्वपक्षीय मित्र हे त्यांचे खास वैशिष्ठ राजकारणापेक्षा समाजकारणाची त्यांना आवड आहे. सरकारी कार्यालय असो की दवाखाना असो किंवा पुण्या मुंबईत शासकीय कामात काही अडचणी आल्या तर त्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी मोहनराव नेहमीच धावून गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.
महाराष्ट्र सरपंच परिषदेत ते काम करीत आहेत. सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कोरोना संकटात अनेक रुग्णांना त्यांनी मदत केली. औषधे, इंजेक्शन उपलब्ध करून दिली. वडगांव सावताळ येथील सावताळबाबा उत्सव समितीमध्ये ते प्रमुख कार्यकर्ते म्हणून कार्यरत असतात. मंदिर असो की शाळा असो की गरीब कुटूंबाला मदतीचा प्रश्न असो त्यासाठी मोहनराव त्यासाठी सदैव तप्तर असतात. मनमिळावू, सर्वसमावेशक भुमिका घेऊन प्राप्त परिस्थितीला सामोरे जाऊन सकारात्मक वृत्तीने जीवन जगणारा हसतमुख चेहरा व प्रसन्न भाव ठेवून अजात शत्रु वृत्ती ठेवणारा हा कार्यकर्ता वडगांव सावताळ परिसरात सातत्याने सामाजिक योगदान देत आहे.
गर्व नाही, फुगीरपणा नाही, ताठपणा नाही सर्वांशी मिळून मिसळून वागणारा मोहन रोकडे यांनी मित्र परिवाराबरोबरच खासदार, आमदार, मंत्री, अधिकारी, पदाधिकारी यांच्याशीही सुसंवाद ठेवलेला आहे. समाजकार्यात पुढाकार घेणाऱ्या मोहनरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
..