व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यवसायात प्रगती करा : शिवाजीराव कर्डिले ढोकी येथे उद्योजक कैलास नऱ्हे यांच्या एस. के. हॉटेलचे उद्घाटन राजकीय साम...
व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यवसायात प्रगती करा : शिवाजीराव कर्डिले
ढोकी येथे उद्योजक कैलास नऱ्हे यांच्या एस. के. हॉटेलचे उद्घाटन
राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील ढोकी येथील युवा उद्योजक कैलास नऱ्हे यांच्या एस. के. या नवीन हॉटेल व्यवसायाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व पारनेर तालुक्याचे नेते अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
युवा उद्योजक कैलास नऱ्हे यांच्या नवीन हॉटेल व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील जिल्ह्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की तरुणांनी व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून स्पर्धेच्या युगामध्ये आपला व्यवसायामध्ये प्रगती साधावी व्यवसाय करत असताना नफा तोटा यांचा ताळमेळ ठेवावा हॉटेल व्यवसाय करत असताना ग्राहकांना उच्चप्रतीची सेवा दिल्यास ग्राहक आपोआप आपल्याकडे आकर्षित होतो. कैलास नऱ्हे या युवकाने हॉटेल व्यवसाय करत असताना सर्वांना सोबत घेऊन आपल्या व्यवसायाची वाढ करावी
तसेच यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील म्हणाले की कैलास नऱ्हे हा माझा युवा सहकारी असून कैलास नऱ्हे सुरु केलेला या हॉटेल व्यवसाया नक्कीच पुढील यशस्वी वाटचालीस मी शुभेच्छा देतो. कैलास ने व्यवसायिक प्रगती करत असताना सामाजिक दृष्टीकोनही ठेवून काम करावे असे मत यावेळी व्यक्त केले.
एस. के. हॉटेल या व्यवसायाच्या कार्यक्रम प्रसंगी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे, अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे विश्वस्त सिताराम खिलारी, नगर सह्याद्री वृत्तपत्राचे संपादक अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजीराव शिर्के सर, दूध संघाचे मा. चेअरमन राहुल पाटील शिंदे, कान्हूर पठार पतसंस्थेचे चेअरमन सुशीला ठुबे, युवा नेते अमोल साळवे, प्रदीप दाते, मनसे पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, डॉ. राजेंद्र आव्हाड, सुरेश पठारे, शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रियंकाताई खिलारी, टाकळी ढोकेश्वर गावचे माजी सरपंच शिवाजी खिलारी, मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर, इंजि. प्रसाद झावरे पाटील पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, वडगाव सावताळ येथील मोहनराव रोकडे, टाकळी ढोकेश्वर उपसरपंच किरण उर्फ रामभाऊ तराळ, भाजपा पारनेर शहराध्यक्ष किरण कोकाटे, जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ठुबे, जोगेश्वरी पतसंस्था चेअरमन जालिंदर वाबळे, पै. दत्तात्रय जगदाळे, ज्येष्ठ नेते निजामभाई पटेल, विकास अल्हाट, अमोल अल्हाट, स्वप्नील ठुबे, किरण पोपळघट, सुनील टोपले सर, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका संघटक महेश झावरे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका सचिव अन्सार पटेल, तसेच टाकळी ढोकेश्वर कर्जुले हर्या वासुंदे तिखोल परिसरातील तसेच ढोकी येथील ग्रामस्थ युवक वर्ग व उद्योजक कैलास नऱ्हे मित्रपरिवार व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे कार्यक्रम प्रसंगी युवा नेते अमोल साळवे यांनी आभार मानले.