वडगाव सावताळसह वाड्या वस्तीवर पाणीपुरवठा सुरळीत करा संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस...
वडगाव सावताळसह वाड्या वस्तीवर पाणीपुरवठा सुरळीत करा
संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या
संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी...
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील गावासह प्रमुख वाड्या-वस्त्यांवर गेल्या १५ दिवसापासून पाणी येत नसल्याने गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी सकाळी ठिय्या आंदोलन केले. हे ठिय्या आंदोलन उपसरपंच रुपाली वाणी ग्रामपंचायत सदस्य आशाताई तिखोळे माजी सरपंच राजेंद्र रोकडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ रोकडे, संपत वाणी, ग्रामपंचायत सदस्य संजय रोकडे, किरण सरोदे, संदीप व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली सविता भोसले, विमल जांभळकर, सुलाबाई गांगुर्डे, गुंफा वाघ, विमल शिंदे यांच्यासह अनेक महिलांनी केले.
महिलांनी आंदोलनाचा पावित्रा घेताच स्थानिक टॅंकरच्या साह्याने गावात ग्रामपंचायत पदाधिकारी पाणी उपलब्ध करून दिले असून दोन दिवसात वडगाव सावताळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
तर दुसरीकडे या पाणी योजनेच्या ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे व निष्काळजीपणामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या वडगाव सावताळ गावाला काळू मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात असून पाणीपुरवठा करणे विद्युत पंप जळाल्याने गेल्या पंधरा दिवसापासून हा पाणीपुरवठा खंडित झाला आहे यासंबंधीची माहिती ठेकेदाराने ग्रामपंचायत पदाधिकारांना दिली नसल्याने या महिलांचा रोषास या पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे दोन दिवसात वडगाव सावताळ गावातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आली असून ग्रामपंचायत पदाधिकारी दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
तर दुसरीकडे पाणी पुरवठा करण्यासाठी सहा महिन्यापूर्वी नवीन विद्युत पंप बसविण्यात आले होते परंतु ही विद्युत पंप आले नाही गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावेळी पाणीपुरवठा करणारी मोटार जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत तात्काळ टॅंकरने पाणीपुरवठा करणार असल्याचा शब्द या वेळी आंदोलन करते महिलांना व ग्रामस्थांना वडगाव सावताळ चे सरपंच बाबासाहेब उर्फ मिठू शिंदे व ग्रामसेवक लोंढे भाऊसाहेबांनी दिला. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी...
वडगाव सावताळ ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणीसुद्धा ग्रामस्थांसह महिलांनी केली आहे.