तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवा : संतोष वाडेकर पारनेर येथे पाणी प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांसाठी जनजागृती बैठक पारनेर प्र...
तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवा : संतोष वाडेकर
पारनेर येथे पाणी प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांसाठी जनजागृती बैठक
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्याचे राजकारण नेहमी पाणीप्रश्ना भोवती फिरताना आपल्याला दिसते. परंतु तालुक्याचा पाणी प्रश्न काही सुटला नाही अनेक वेळा या पाणी प्रश्नावर चर्चा-मंथन झाले परंतु प्रश्न जैसे तेच राहिला. पाणी प्रश्नावर वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले गेले अनेक निवडणुका या प्रश्नाभोवती फिरत राहिल्या परंतु सर्वसामान्य पारनेरकरांच्या घशाला कोरड आजही कायम आहे. पारनेरच्या जनतेचा वापर फक्त मतानंपुरताच झाला. पाणी प्रश्नासाठी तालुक्यात अनेक पाणी परिषदा झाल्या परंतु त्यांचा वापर हा सोयीच्या राजकारणासाठी झाला.
पारनेर तालुक्याचा अत्यंत महत्त्वाचा हा पाणी प्रश्न सुटला तर पारनेर नगर श्रीगोंदा तालुक्यातील पठार भागावरील जवळपास दोनशे पेक्षा जास्त गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींना आपले हेवे दावे व राजकीय जोडे बाजूला ठेवून तालुक्याच्या पाणीप्रश्नावर यापुढील काळात एकत्र यावे लागेल असे मत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या आहे.
दरम्यान सह्याद्री घाटमाथ्यावरील पाणी अडवून त्या पाण्याचा दुष्काळी भागाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न प्रलंबित आहे. नगर दक्षिणच्या पठार भागावरील पारनेर-नगर श्रीगोंदा तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजली जाणारी साकळाई जलसिंचन योजना तसेच शहाजापूर, राळेगणसिद्धी, पुणेवाडी, कान्हूर पठार उपसा जलसिंचन योजना मार्गी लागली तर वर्षानुवर्ष दुष्काळी ओळख असलेल्या जिल्ह्यातील पठार भागाची तहान भागल्या शिवाय राहणार नाही. नगर दक्षिण पठार भागाची पाण्याची तहान कशापद्धतीने भागवली जाऊ शकते यावर अभ्यास करून माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी प्लॅन तयार केला आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन ते आता पाणी प्रश्नावर लढा उभारत आहेत. तालुक्याच्या पठार भागावरील प्रत्येक गावात शेतकऱ्यांपर्यंत जाऊन सर्वसामान्य शेतकऱ्याला आंदोलनातही सहभागी करून घेणार आहेत.
बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी काढण्यासाठी आता त्यांनी कंबर कसली असून शेतकऱ्याला डिजिटल स्वरूपात माहिती देणार असून जनजागृतीही करणार आहेत.
पारनेर पंचायत समिती सभागृहात त्यांनी शेतकरी व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना समवेत बैठक घेतली यावेळी तालुक्याच्या पाणीप्रश्नावर विचारमंथन झाले. तसेच पठार भागाला पाणी कशा पद्धतीने मिळू शकते ते भोर यांनी सर्वांना समजून सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीला भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, प्रदेश सचिव किरण वाबळे, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष राम वाडेकर, जिल्हा संघटक संतोष वाबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम देठे, जिल्हा सचिव संतोष कोरडे, कारभारी आहेर, तुषार आहेर, युवक जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब झांबरे, अविनाश देशमुख, तालुका अध्यक्ष विशाल करंजुले, तालुका प्रवक्ते राजू रोकडे, संजय भोर, महेश झावरे, नानाभाऊ काशीद, विलास गागरे, चेअरमन संजय भोर, विठ्ठल देठे, नंदू साळवे अन्सार पटेल, बाळासाहेब वाळुंज, विलास वाघमारे, वसंत साठे, सावळेराम साठे, खंडू गुंजाळ, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सचिन काकडे, रामदास गगे ,बाळासाहेब सातव ,ताराचंद करंजुले, संतोष देशमुख, बबन शिंदे, पाराजी जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.
पाणीप्रश्न संदर्भात लढा उभारण्यासाठी प्रत्येक गावात बैठका
पाणी प्रश्नासंदर्भात लढा उभारण्यासाठी व सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तालुक्यात पंचायत समिती गण निहाय प्रत्येक गावात बैठका घेणार असून तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला या लढ्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकरी नेते भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी सांगितले.