वाढदिवस विशेष... प्रकाशशेठ चिकणे एक धडपड्या उद्योजक व्यवसायाच्या माध्यमातून युवा पिढी समोर बनले आदर्श व्यवसायिक पारनेर प्रतिनिधी : उद्योजक ...
वाढदिवस विशेष...
प्रकाशशेठ चिकणे एक धडपड्या उद्योजक
व्यवसायाच्या माध्यमातून युवा पिढी समोर बनले आदर्श व्यवसायिक
पारनेर प्रतिनिधी :
उद्योजक प्रकाश पोपटराव चिकणे यांनी आपल्या वडिलांचा व्यवसायाचा वारसा चालवण्यासाठी सावरगाव सारख्या ग्रामीण भागातून पुढे येत स्वतःच्या व्यवसायांमध्ये आज आर्थिक प्रगती साधली आहे. त्या माध्यमातून त्यांनी युवा पिढी समोर सामाजिक आसा आदर्श निर्माण केला असून आजच्या युवा पिढीसाठी ते एक आदर्श व्यवसायिक म्हणून समोर आले आहेत.
दरम्यान २००३ पासून प्रकाशशेठ हे व्यवसायिक काम करत आहेत. परिसरामध्ये त्यांच्याकडे एक यशस्वी उद्योजक म्हणून पाहिले जात असून त्यांनी युवकांसमोर आदर्श व्यवसायिक म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली असल्याने त्यांच्या या यशामागे त्यांचे अपार कष्ट मेहनत नियोजन बद्धता या सर्व गोष्टी आहेत. समाजात राहून लोक सहवास त्यांना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन आला आहे.
उद्योजक प्रकाशशेठ चिकणे हे २००३ पासून व्यवसाय करतात त्यामध्ये अर्थमूव्हर्स, प्लॉट खरेदी विक्री व डेवलपमेंट, आळेफाटा येथे मोटार खरेदी विक्री व्यवसाय तसेच वर्कशॉप आणि हॉटेल व्यवसायातही त्यांनी आपली प्रगती साधली आहे.
प्रकाशशेठ चिकणे एक युवा धडपड्या उद्योजक असून सामाजिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी व्यवसायांमध्ये आपली प्रगती साधली आहे. समाजाच्या ही अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे असतात. सामाजिक हितासाठी काम करणारे उद्योजक प्रकाशशेठ चिकणे आज व्यावसायिक वृद्धी करत आजच्या युवकांसमोर व्यवसायाच्या माध्यमातून एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
उद्योजक प्रकाशशेठ चिकणे यांनी व्यवसायाच्या माध्यमातून आज समाजातील अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून आजचा बेरोजगार युवक रोजगारभिमुख बनवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रकाशशेठ चिकणे हे काम करत असून त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
यापुढील काळात काम करत असताना प्रकाशशेठ चिकणे म्हणाले की मी व्यावसायिक दृष्टिकोनातून काम करताना आपल्या व्यवसायाचा फायदा समाजाच्या हितासाठी झाला पाहिजे. तसेच अनेक युवक रोजगारभिमुख झाले पाहिजे ही महत्त्वकांक्षा मनात ठेवून या पुढील काळात मी प्रामुख्याने काम करणार आहे असे त्यांनी सांगितले.