प्रथम पुण्यस्मरण : तुषार उंडे दिलदार हृदयाचा सख्खा; श्रीमंत मनाचा मित्र... पारनेर प्रतिनिधी : श्रीमंत मनाचा मित्र होतास तू... दिलदार हृदयाच...
प्रथम पुण्यस्मरण : तुषार उंडे दिलदार हृदयाचा सख्खा; श्रीमंत मनाचा मित्र...
पारनेर प्रतिनिधी :
श्रीमंत मनाचा मित्र होतास तू...
दिलदार हृदयाचा सख्खा होतास तू...
जिवाला जीव देणारा जिवलग होतास तू...
मित्र प्रेमाचा अवीट जरा होतास तू...
सर्वांच्या सोबत नेहमी हसतमुख हसणारा सर्वांना हवाहवासा वाटणारा तुषार आपल्यातून जाऊन एक वर्ष कधी झाले समजलेच नाही. मित्रांच्या हृदयातील राजा माणूस सर्व कुटुंबाचा आधार सर्वांचा आवडता असलेला कर्जुले हर्या येथील तुषार संतोष उंडे यास आपल्यातून जाऊन एक वर्ष झाले. तुषार आपल्यात असल्याचा आजही भास होतोय कारण नेहमी हसतमुख असलेला खोडकर तेवढाच शांत, संयमी, चंचल असलेला कोणतीही कला लवकर अवगत करून घेण्याची अद्भुत शक्ती तुषारच्या अंगी होती. एखाद्या गोष्टीत मेहनतीतून प्रगती कशी साधायची हे खरे या दिलदार मित्राकडून शिकायला भेटले. कोणत्याही कामात कधीही निसंकोचपणे आपल्या मेहनतीतून कष्टातून व प्रयत्नांतून यश साध्य करण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असायचा. हुन्नरी असलेला तुषार उंडे हा आपल्या कुटुंबाचा आधार होता पण अर्ध्यावरती डाव मोडून तू सर्वांना सोडून गेला का असे वागला? नातेवाईक मित्रपरिवार कुटुंबाच्या आठवणीत आयुष्यभर घर तयार करून तू का शांतिदूत बनला.
तुषार म्हणजे एका अवीट प्रेमाचा झरा होता सर्वांना सोबत हातात हात घेऊन समर्थपणे जीवनाच्या वाटेवर चालणारा मित्रांचा दिलदार होता परंतु अर्ध्यावरती धोका देऊन आम्हा सर्वांना तू देवाघरी का रे गेला. या कडू आठवणी आमच्या नेहमी स्मरणात ठेवून तू निघून गेला.
वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी तुषार उंडेच्या जाण्याने कुटुंबाची भरून न निघणारी हानी झाली आहे. तुषारला आपल्यातून जाऊन आता एक वर्ष कसे सरले हे कळले नाही तुषारचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम मंगळवार दि. १४ रोजी सकाळी ७:३० वाजता कर्जुले हर्या येथे दुःखांकित अंतकरणातून साजरा करण्यात येणार आहे. उंडे कुटुंबाच्या दुःखामध्ये सर्व नातेवाईक सहभागी असून कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. कुटुंबाला दुःखातून सावरण्यासाठी मोठी शक्ती परमेश्वराने द्यावी.
तुषार तू मित्रांसाठी कुटुंबासाठी पुन्हा फिरून येशील या आशेवर आम्ही सर्वजण तुझी वाट पाहत आहोत... तुझा हृदय प्रसन्न आत्म्यास परमेश्वराच्या जवळ शांती मिळो..