शेतकरी, कष्टकरी, गरीब समाजाचा आधार पोपटराव साळुंके गुरुजी शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर जनतेसाठी घेतले वाहून गुरुजी करीत आहे गरिबांना...
शेतकरी, कष्टकरी, गरीब समाजाचा आधार पोपटराव साळुंके गुरुजी
शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर जनतेसाठी घेतले वाहून
गुरुजी करीत आहे गरिबांना आधार देण्याचं काम
साळुंके गुरुजी आक्रमक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व
पारनेर प्रतिनिधी :
वासुंदे गावचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य पोपटराव साळुंके गुरुजी म्हणजे गावातील कष्टकरी गरीब शेतकरी दिन दलित समाजाचा खरा आधार आहेत. सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी ते रात्रंदिवस काम करत आहेत. वासुंदे गावातील प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी ते सर्वांच्या पुढे असतात चाळीस वर्ष शिक्षण सेवेत शिक्षणाचे ज्ञानदानाचे पवित्र काम त्यांनी केले आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. साळुंके गुरुजी हे एक आक्रमक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्यानंतर समाजाप्रती आदरभाव जपत समाजासाठी आपण यापुढे शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार ही भावना मनात ठेवून वासुंदे गावच्या सर्वांगीण विकासासाठी व गावातील समस्या सोडवण्यासाठी ते झटत असून गावातील सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना त्यांनी आजपर्यंत अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. गावातील पेक्षा जास्त गरीब कुटुंबांना त्यांनी शासनाच्या वनविभागाच्या गॅस योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. गावात घरकुल योजना शेतकऱ्यांच्या संबंधित विविध योजना या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समिती माध्यमातून शेतकरी कष्टकरी गरीब कुटुंबांना मिळवून दिल्या आहेत. वासुंदे गावचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी ते काम करत आहेत. प्रस्थापित गटाशी दोन हात करून ते ग्रामपंचायत सदस्य झाले पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांचे त्यांना सहकार्य असून वासुंदे गावच्या विकासासाठी आमदार निलेश लंके त्यांना सहकार्य करत आहेत. पोपटराव साळुंके गुरुजी हे गावातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरपंच असून गावच्या विकासासाठी व सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी ते काम करत आहेत.
गावातील युवा पिढी गुरुजींच्या कामावर खूश असून गुरुजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. साळुंके गुरुजी म्हणजे खऱ्या अर्थाने गरीब जनतेचे सेवक असून दुष्काळी परिस्थितीमध्ये गावात पिण्याच्या पाण्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न लक्षात आल्याने यावेळी त्यांनी कोणतेही कारण न देता शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावच्या सामाजिक कामांमध्ये भाग घेत वासुंदे गावातील प्रत्येक वाडी-वस्तीवर पाणी पोहोचले पाहिजे ही भूमिका ठेवून कधी स्वखर्चाने कधी शासकीय मदतीने टँकरच्या माध्यमातून स्वतः पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर सोबत राहून पाणी घरापर्यंत पोहोचवले व लोकांची सेवा केली. खऱ्या अर्थाने पोपटराव साळुंके गुरुजी हे जनसेवक असून गरिबांची सेवा करणे व गरीब समाजाला न्याय देणे व त्यांच्या हक्कासाठी लढणे हे त्यांचे ब्रीद आहे. अशा या महान जेष्ठ व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस साळुंके गुरुजी वासुंदे गावचा अध्यात्मिक सामाजिक कार्यामध्ये व राजकीय प्रवाहामध्ये नेहमी सहभागी असतात या माध्यमातून ते काम करत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी ते आपल्यातील एक सहकारी वाटतात युवक ज्येष्ठ महिला यांना ते आधार वाटतात. वासुंदे गावचा या ज्येष्ठ नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा या पुढील काळात त्यांनी ग्रामस्तरावर काम करताना नेहमीच समाज हितासाठी काम करत राहावे व त्यांच्या पुढील राजकीय सामाजिक कार्यास शुभेच्छा ..
COMMENTS