वनकुटे येथे नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप पारनेर प्रतिनिधी : आमदार नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने वनकुटे परि...
वनकुटे येथे नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप
पारनेर प्रतिनिधी :
आमदार नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने वनकुटे परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. सरपंच अॅड. राहूल झावरे यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यकर्त्यांनी परिसरातील आठ शाळांमधील विद्यार्थी नेत्यांनी पाठविलेले साहित्य हाती पडताच आनंदले.
आमदार नीलेश लंके यांची जशी तरूणांमध्ये मोठी क्रेझ आहे, तशीच क्रेझ शालेय विद्यार्थ्यांमध्येही आहे. आ. लंके यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठीही शालेय विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे नेहमीच पाहावयास मिळते. हे विद्यार्थी माझे भावी मतदार आहेत असे सांगत आ. लंके हे या विद्यार्थ्यांची नेहमीच आस्थेवाईकपणे चौकशी करतात. जसे कार्यकर्ते संबोधतात तसेच शालेय विद्यार्थीही आ. लंके यांना नेते याच नावाने संबोधतात. त्यामुळे नेत्यांनी पाठविलेले साहित्य हाती पडताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलले.
विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी माझा सत्कार न करता मला शालेय साहित्य भेट द्या, त्याचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांना होईल असे ते नेहमीच आवाहन करतात. विधानसभा निवडणूकीनंतर कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्षे शाळा बंदच होत्या. त्यामुळे आ. लंके यांच्याकडे संकलीत झालेले साहित्य फारसे वितरीत झाले नाही. यंदा मात्र आ. लंके यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करीत असून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही आ. लंके यांच्याविषयी आकर्षण आहे. त्यांनी पाठविलेले शालेय साहित्य हाती पडल्यानंतर हे विद्यार्थी आनंदले.
वनकुटे परिसरातील जिल्हा परिषदेच्या गावठाण, माळीवस्ती, ठाकरवाडी, पठारवाडी, तास, तास गावठाण, भुलदरा तसेच हनुमाननगर येथील शाळांमध्ये मंगळवारी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
ठाकरवाडी येथे सरपंच राहूल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वहया, पेन, पेन्सिल व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी संपत गागरे, अजित गागरे, गणेश शिंदे, उत्तम भले, पोपट मेंगाळ, भीमराज गांगड, विनायक मधे, रमेश केदार, भाउसाहेब पारधी, निवृत्ती मधे मुख्याध्यापक घुणे, शिक्षक कदम आदी यावेळी उपस्थित होते.
वनकुटे गावठाण येथील शाळेत ज्येष्ठ नागरीक कोंडीभाऊ घोडके यांच्या उपस्थितीत शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. सरपंच राहूल झावरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास माजी सरपंच बाळासाहेब बर्डे, उपसरपंच बंडू उर्फ अर्जुन कुलकर्णी, सदस्य दिपक खामकर, राजू डहाळे मुख्यध्यपक सुनील खामकर सर भीमराज मुसळे, भाउसाहेब वालझाडे, काशिनाथ भगत, रामदास शेलार, दादाभाऊ नवले, श्रीमती झरेकर मैडम, श्रीमती पायमोडे मैडम, मच्छिंद्र मुसळे, संदीप औटी, हिरबा केसकर, कुशाबापू गागरे, आदीनाथ ढवळे श्री. भाऊसाहेब काळनर
श्री.आण्णासाहेब काळनर श्री.आबा मुसळे श्री.पोपट बागुल श्री.सतीश सांबारे श्री.विकास काळे श्री.संजय काळणर श्री.भाऊसाहेब शिंदे श्री.विजय बर्डे श्री.चेतन बर्डे श्री.सोमनाथ बर्डे श्री.सोमनाथ बर्डे श्री.किशोर शिंदे श्री.सिराज शेख श्री.नारायण काळनर श्री. शरद काळनर श्री.सुदाम वालझाडे श्री.भाऊसाहेब पवार श्री.मोहित पवार श्री.संजय गायकवाड श्री.कैलास बर्डे श्री.गोरख बेलकर श्री.बाळा शिंदे श्री.शरद आग्रे किरण शिंदे हे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते
पालकांकडून कृतज्ञता
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी घेणाया आमदार नीलेश लंके यांनी पाठविलेल्या शालेय साहित्याबद्दल पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनीही साहित्य हाती पडल्यानंतर आनंद व्यक्त केला.