सचिन पाटील वराळ यांचे नेतृत्व अल्पसंख्याक समाजासाठी विकासाभिमुख : मनोहर राउत पारनेर प्रतिनिधी : अल्पसंख्याक समाजाला सर्वाधिक पाठबळ देण्याच...
सचिन पाटील वराळ यांचे नेतृत्व अल्पसंख्याक समाजासाठी विकासाभिमुख : मनोहर राउत
पारनेर प्रतिनिधी :
अल्पसंख्याक समाजाला सर्वाधिक पाठबळ देण्याचे काम संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ हे करीत असून समाजासाठी वराळ पाटील हे विकासाभिमुख नेतृत्व असल्याचे प्रतिपादन ओबीसी विभागाचे भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोहर राउत यांनी व्यक्त केले आहे. राउत यांची ओबीसी विभागाच्या भाजपच्या तालुका अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, ग्रामस्थ व अल्पसंख्याक समाजाच्या वतीने फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, ज्येष्ठ नेते भास्करराव वराळ, गजाभाउ ठुबे, अल्पसंख्याक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक धोंडीभाऊ राऊत,भाजपचे तालुका उपाध्यक्ष मोहनशेठ खराडे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष ईधाटे,मनोज ईधाटे , दत्तात्रय राउत,अस्लम इनामदार ,विलास हारदे, सुनील उचाळे, आप्पा वराळ ,भिमराव लामखडे ,गंगा वरखडे, राजेश राऊत, अशोक नरवडे ,सोपान राऊत, सुनील राऊत ,नवनाथ राऊत,शशिकांत राऊत ,नाना राऊत, किरण राऊत, अशितोष राऊत, नवनाथ गायकवाड, शुभम गायकवाड, किशोर हरदे ,मयूर राऊत, पत्रकार योगेश खाडे , निलेश घोडे ,बाबाजी लंके , पत्रकार विजय रासकर, रेवन राऊत, चंद्रकांत गजरे, दत्ता राऊत, गजानन ठुबे, प्रवीण वराळ, रोहिदास रसाळ , सुदेश ईरोळे, विजय भुकन ,
सुमनबाई कवाद, हरिष ससाणे, समीर शेख ,संजय बळीद, मोरेश्वर गणेश मित्र मंडळ, संत सेना नाभिक मित्र मंडळ, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन, अल्पसंख्याक समाज मंडळ, मुस्लिम समाज मंडळ, कोष्टी समाज मंडळ, जैन समाज बांधव आदींचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राउत यावेळी म्हणाले गेली पन्नास वर्षांपासून वराळ पाटील परिवार अल्पसंख्याक समाजाला आधार देण्याचे काम करीत असून सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील, मच्छींद्र आबा, संदीप पाटील वराळ तसेच आजही पाटलांचेच अनुकरण करीत सचिन पाटील वराळ हे आमच्या अल्पसंख्याक समाजाचे मुख्य आधारस्तंभ असून विकासाभिमुख नेतृत्व म्हणून अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या नेतृत्वाचा अभिमान असल्याचे प्रतिपादन राउत यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ म्हणाले की मनोहर राउत हे अल्पसंख्याक समाजाचे मार्गदर्शक व नेते आहेत पंधरा वर्षांपासून ते समाजकारणात सक्रीय असून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांचे योगदान फार मोठे आहे.गेली कित्येक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून पक्षाने त्यांना मोठी संधी दिली असून अल्पसंख्याक समाजाचा अभिमान म्हणून ते कार्यरत असल्याचे प्रतिपादन वराळ पाटील यांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्लमभाई इनामदार यांनी केले शेवटी नाभिक समाजाचे शहराध्यक्ष नाना राउत यांनी आभार मानले.