राष्ट्रवादीचे गौरव नरवडे यांना युवा आयडॉल पुरस्कार जाहीर आमदार लंके यांच्या मावळ्याचा खऱ्या अर्थाने सामाजिक सन्मान पारनेर विशेष प्रतिनिधी : ...
राष्ट्रवादीचे गौरव नरवडे यांना युवा आयडॉल पुरस्कार जाहीर
आमदार लंके यांच्या मावळ्याचा खऱ्या अर्थाने सामाजिक सन्मान
पारनेर विशेष प्रतिनिधी :
नगर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचवणारे सामाजिक काम करत पक्षसंघटना बळकट करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले युवा नेतृत्व गौरव नरवडे यांना नुकताच राजकीय, सामाजिक व संघटनात्मक पातळीवर उत्तम कार्य केल्या बद्दल जी. आर. एम. ग्रुप च्या वतीने युवा आयडॉल पुरस्कार जाहीर झाला आहे.
दरम्यान गौरव नरवडे हे युवकांचे नेतृत्व असून युवकांसाठी काम करत युवकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी नगर तालुका व अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पासून ते सक्रीय राजकारणात असून त्यांनी अनेक गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम केले आहे.
त्यांच्या या कामाची खऱ्या अर्थाने युवा आयडॉल पुरस्कार मिळाल्यामुळे दखल घेतल्याचे लक्षात येते. पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना त्यांनी पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवले असून पुरोगामी विचारांच्या राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने नगर तालुक्यामध्ये त्यांच्यामुळे युवा जोश निर्माण झाला आहे. जी. आर. एम. ग्रुप ने त्यांचा केलेला सन्मान हा खऱ्या अर्थाने गौरव नरवडे यांच्या कामाचाच सन्मान असल्याचे लक्षात येते.
नगर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना गौरव नरवडे यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केले आहे. त्यामाध्यमातून पक्षाला त्यांनी ताकद दिली आहे आमदार निलेश लंके यांचे गौरव नरवडे यांच्यावर विशेष प्रेम आहे.
जी. आर. एम. ग्रुप ने युवा आयडॉल पुरस्कार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टीचे नगर तालुका कार्याध्यक्ष गौरव नरवडे यांचा विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातून सन्मान होत आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर यावेळी बोलताना गौरव नरवडे म्हणाले हा माझ्या कामाचा खराखुरा सन्मान आहे. आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर नगर तालुक्यामध्ये काम करत असताना अनेक गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो. जी. आर. एम. ग्रुप ने हा माझा युवा आयडॉल पुरस्कार देऊन जो सन्मान केला. त्याबद्दल मी सर्व जी आर एम ग्रुपचा आभारी आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व नगर तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना फोन करून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.