महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील सर्वांना रेशनकार्ड मिळणार आमदार नीलेश लंके यांची माहिती;गरजूंना मोठा दिलासा पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदा...
महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील सर्वांना रेशनकार्ड मिळणार
आमदार नीलेश लंके यांची माहिती;गरजूंना मोठा दिलासा
पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळे) :
महाराजस्व अभियानांतर्गत, शासन आपल्या दारी या उपक्रमात सर्व गरजू नागरीकांना रेशनकार्ड वितरीत करण्यात येणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. या योजनेचा लाभ प्रत्येक गरजूला मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जनजागृती करण्याच्या सुचना आमदार लंके यांनी दिल्या आहेत.
ज्यांना रेशनकार्ड हवे आहे, अशा नागरीकांकडून नवीन शिधापत्रीका,शिधापत्रीका दुरूस्ती तसेच जिर्ण शिधापत्रीका बदलणे यासाठी अर्ज मागविण्यात आले आले आहेत.
अर्जासोबत इतर रेशन कार्डमधून नाव कमी केल्याचा दाखला, तलाठयाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा म्हणून घरपट्टी किंवा भाडेकरार, किंवा लाईट बिल किंवा ग्रामपंचायत ८ अ उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, निवडणूक ओळखपत्र झेरॉक्स ही कागदपत्रे सादर करण्याचे सुचित करण्यात आले आहे. कागदपत्रांसह रेशकार्डसाठीचा अर्ज नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या पारनेर येथील संपर्क कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जुन्या रेशनकार्डमधून नाव वगळून नविन घेणे, दुरूस्ती करणे, जिर्ण रेशनकार्ड बदलणे यासाठी नागरीकांना तहसिल कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.
तेथे आडवणूक होत असल्याच्याही तक्रारी येतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी पुढाकार घेउन सर्वच नागरीकांना कोणत्याही त्रासाशिवाय रेशनकार्ड मिळावे यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
निलेश लंके प्रतिष्ठाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावातील ज्या नागरीकांना रेशनकार्ड हवे असेल अशा सर्व नागरीकांचे अर्ज व कागदपत्रे स्विकारून नीलेश लंके प्रतिष्ठाण जनसंपर्क कार्यालय पारनेर येथे जमा करण्याच्या सुचना आमदार लंके यांनी दिल्या.