सर्वसामान्य रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार : डॉ. दीपक आहेर मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून उपक्रम पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील कर्जुले हर...
सर्वसामान्य रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार : डॉ. दीपक आहेर
मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून उपक्रम
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटरच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना वर माफक व अत्यल्प दरामध्ये उपचार करण्यात येत आहेत. या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोण समोर ठेवून रुग्णसेवेचे काम सुरू असल्याचे मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर यांनी सांगितले.
मातोश्री आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये ही अनेक रुग्णांवर मोफत व अत्यल्प दरामध्ये उपचार करण्यात आले. रुग्णसेवेचे उत्तम कार्य मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून पारनेर तालुक्यांमध्ये सुरू आहे. शैक्षणिक सामाजिक तसेच रुग्णसेवेचे काम मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाते.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्य प्रमाणे मातोश्री हॉस्पिटल हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब आदिवासी घटकातील रुग्णांवर उपचार करत आहे. अत्याधुनिक स्वरूपाचे सर्व सुख सुविधा युक्त असे हॉस्पिटल नगर-कल्याण महामार्गावर कर्जुले हर्या येथील कोकाटे वस्ती या ठिकाणी आणि उभारण्यात आले असून या हॉस्पिटलचा लाभ सर्वसामान्य गरीब घटकाला व्हावा हा हेतू समोर ठेवून डॉ. दीपक आहेर व त्यांचे सर्व सहकारी सध्या काम करत आहेत डॉ. दीपक आहेर हे एक सामाजिक व्यक्तिमत्त्व असून सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत राहणे हे त्यांनी ओळख आहे.
मातोश्री आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून मोफत प्रस्तुती, आयुर्वेदिक औषधे ५०% सवलती मध्ये, रक्त लघवी तपासणी ५०% टक्के सवलतीमध्ये पंचकर्म ५० % टक्के सवलतीत एक्स-रे फक्त १५० रुपया मध्ये व मोफत डायलिसिस ही सेवा सध्या राबवली जात आहे.
या देण्यात येणाऱ्या सेवेचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा
मातोश्री हॉस्पिटलने कोरोना काळामध्ये संगमनेर, जुन्नर, पारनेर, नगर, राहुरी व शिरूर या तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत व अत्यल्प दरामध्ये उपचार केले.
COMMENTS