बाळासाहेब पाटील उदार मनाचे व्यक्तीमत्व : ऍड. बाबासाहेब खिलारी टाकळी ढोकेश्वर येथे बाळासाहेब पाटील यांचा 65 वाढदिवसानिमित्त सन्मान पारनेर प्...
बाळासाहेब पाटील उदार मनाचे व्यक्तीमत्व : ऍड. बाबासाहेब खिलारी
टाकळी ढोकेश्वर येथे बाळासाहेब पाटील यांचा 65 वाढदिवसानिमित्त सन्मान
पारनेर प्रतिनिधी :
वासुंदे गावचे सुपुत्र एक यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आनंदराव पाटील यांच्या 65 व्या वाढदिवसाच्या औचित्य साधत टाकळीढोकेश्वर, कर्जुले हर्या, वासुंदे परिसरातील मित्रपरिवाराने त्यांचा सन्मान केला.
बाळासाहेब पाटील हे एक उदारमतवादी व्यक्तिमत्व असून नेहमी सर्वांच्या सोबत प्रेमाने राहणारे हे व्यक्तिमत्व वासुंदे गावच्या आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान असून स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या सामाजिक प्रेरणेतून व सुसंस्कृत नेतृत्व सुजीतराव झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सुरू असलेले कार्य हे उल्लेखनीय आहे.
अशा या बहुआयामी उदारमतवादी व्यक्तिमत्वास सर्व मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. अशी प्रतिक्रिया पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब खिलारी यांनी व्यक्त केली. यावेळी माजी मुख्याध्यापक प्रकाशराव इघे यांनी बाळासाहेब पाटील यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व त्यांना वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करत शुभेच्छा दिल्या.. मोहनराव रोकडे यांनी यावेळी बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा व राजकीय वाटचालीचा गौरव केला.
पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब खिलारी,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणराव ठाणगे, ज्येष्ठ पत्रकार बबनराव गायखे, सरपंच परिषदेच्या अहमदनगर जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे, मा. मुख्याध्यापक प्रकाशराव इघे सर, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आंधळे, गणेश जगदाळे, शंकरराव थोपटे, विठ्ठल सोनावळे गुरुजी आदी यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ युवक उपस्थित होते. बाळासाहेब पाटील यांचा टाकळी ढोकेश्वर परिसरातील मोठा मित्र परिवार यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता.