टाकळी ढोकेश्वर, परिसरात खरीप , हंगामातील पेरणीला सुरुवात पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, म्हसोबा झाप पोखरी वासुंदे, कर्जुले...
टाकळी ढोकेश्वर, परिसरात खरीप , हंगामातील पेरणीला सुरुवात
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, म्हसोबा झाप पोखरी वासुंदे, कर्जुले हर्या, वडगाव सावताळ, खडकवाडी, पळशी, तिखोल या भागामध्ये खरीप हंगामातील पीक बाजरी, मूग, तूर, सोयाबीन, तसेच इतर कडधान्य पेरणीला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांकडे बैलांची संख्या कमी झाल्यामुळे ट्रॅक्टरने पेरणी केली जात आहे.
परिसरात पाऊस उशिरा झाल्यामुळे मुगाची पेरणी लांबली तरी काही शेतकऱ्यांनी मुगाच्या पेरणीला जास्त पसंती दिली आहे. पेरणी साठी येणारा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. तरीही शेतकरी राजा आपली जिद्द सोडत नाही. अगोदरच शेती मालाला शाश्वत बाजार भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी खचून गेलेला आहे.
त्यातच बैलांची संख्या कमी झाल्यामुळे यंत्रसामुग्री पेरणी करून घ्यावी लागते हा खर्च देखील शेतकऱ्यांना परवडणारा नाही. महागाई वाढल्यामुळे बी बियाणांच्या किमतीही वाढल्या आहेत. तरीही शेतकरी आपल्या काळया मातीत पेरणी करत आहे. पुढे जाऊन शेती मालाला काय बाजार भाव मिळेल ही देखील शाश्वत खात्री नाही.
टाकळीढोकेश्वर ग्रामीण भाग असल्यामुळे व येथील अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे पावसाने अजूनही समाधानकारक हजेरी लावलेली नाही तरीही शेतकरी वर्ग खरीप हंगामाची पेरणी करत आहे पावसावर पुढील कालावधी अवलंबून असल्यामुळे पेरणी करण्याचे शेतकऱ्यांनी धाडस दाखवल्याचे लक्षात येते या भागातील अर्थकारण शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतकरी वर्ग पेरणी करत आहे ही पेरणी पावसावर अवलंबून आहे.
मोहनराव रोकडे
(वडगाव सावताळ)