वाढदिवस विशेष आरोग्यदूत दत्तात्रय येवले रुग्णांसाठी बनले आधार आरोग्य सेवेच्या माध्यमातून गोर-गरिबांची सेवा ग्रामस्तरावर उपक्रमशील काम करण्या...
वाढदिवस विशेष
आरोग्यदूत दत्तात्रय येवले रुग्णांसाठी बनले आधार
आरोग्य सेवेच्या माध्यमातून गोर-गरिबांची सेवा
ग्रामस्तरावर उपक्रमशील काम करण्याचा प्रयत्न
राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम
आमदार निलेश लंके यांचे एकनिष्ठ सहकारी
गणेश जगदाळे/पारनेर
तालुक्यातील रेनवडी सारख्या छोट्या गावातून आपल्या जीवनाची सुरुवात करणारा उदयन्मुख युवक म्हणजे दत्तात्रय बन्सी येवले होय. घरची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली नसताना संघर्ष करत संघर्षाशी लढत ते प्रवास करत आहेत. दत्तात्रय येवले संघर्षाचे जीवन जगत समाजाशी बांधिलकी जपत काम करत आहेत. रेनवडी हे तसे तालुक्यातील सगळ्यात छोटे गाव वडील हे हाडाचे शेतकरी सर्वसामान्य कुटुंब परंतु परिस्थितीशी लढण्याची जिद्द मनात होती. त्यामुळे शालेय जीवनापासून संघर्ष करत प्राथमिक माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागात घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुणे या ठिकाणी ते गेले उच्च शिक्षण पूर्ण करत असताना प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला समाजाची सेवा करता यावी हा उदात्त स्वप्न बाळगून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. परंतु त्यामध्ये यश मिळत नसल्याने ते निराश झाले नाही.
समाजाप्रती आपण बांधील आहोत आणि समाजाची सेवा आपण केली पाहिजे ही शिकवण त्यांना लहानपणी त्यांच्या आईवडिलांन पासून मिळाली होती. आई वडील हे शेतकरी असल्यामुळे त्यांनी त्यांचे कष्टमय जीवन जवळून अनुभवले होते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी पुणे या ठिकाणी ते आरोग्य क्षेत्रामध्ये काम करू लागले त्या माध्यमातून आपला स्पर्धा परीक्षा करत असतानाचा मित्र रवींद्र फडतरे यांच्या सहकार्याने त्यांनी सामाजिक उपक्रम म्हणून ब्लड बँक सुरू केली. अहमदनगर-पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात व ग्रामीण भागात त्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेतले त्या संकलित झालेल्या रक्ताचा आवश्यक त्या रुग्णाला रक्तपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले त्या माध्यमातून त्यांच्या हातून मोठे सामाजिक कार्य घडले.
तसेच सर्वसामान्य गरीब जनतेसाठी त्यांनी ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी सर्वरोग निदान शिबिरे घेतले. याकामी त्यांना आरोग्य क्षेत्रातील अनेक वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांचे पण सहकार्य लाभले. सामाजिक उपक्रम राबवत दत्तात्रय येवले हे खऱ्या अर्थाने पाहता पाहता आरोग्य क्षेत्रामध्ये सामाजिक चेहरा बनले आहेत. कोरोना काळात 700 ते 800 रुग्णांना त्यांनी प्लाजमा मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांनी सर्वसामान्य रुग्णांना आधार देण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी त्यांनी मदत पुरवली. रेमडीसिव्हरचा निर्माण झालेला तुटवडा त्यावेळेस त्यांनी अनेक कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी रेमडीसिव्हर पुरविले त्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले व आवश्यक त्या ठिकाणी रक्त पुरवठाही केला. दत्तात्रय येवले हे आरोग्य क्षेत्रामध्ये समाजसेवेचे अगदी प्रामाणिकपणे काम करत असल्याने ते आरोग्यदूत आहेत असा त्यांच्याकडे सर्वसामान्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये करत असलेल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी रेनवडी याठिकाणीही विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे.
दत्तात्रय येवले हे एक सुसंस्कृत संयमी शांत सर्वांना सोबत घेऊन काम करणारे सामाजिक नेतृत्व म्हणून पुढे आले आहे त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना रेनवडी ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे रेनवडी या ठिकाणी ग्राम स्तरावरही उत्तम असे काम सुरू आहे. आमदार निलेश लंके यांचा त्यांना असलेला पाठिंबा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुरोगामी विचारांना धरून त्यांचे सुरू असलेले कार्य हे नक्कीच उत्तम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुरोगामी विचारांना ते मानतात त्या माध्यमातून रेनवडी व परिसरामध्ये ते काम करत आहेत. पुणे या ठिकाणीही त्यांचे सामाजिक राजकीय क्षेत्रांमध्ये उत्तम कार्य सुरू असून सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन आमदार निलेश लंके त्यांच्यासाठी सहकार्य करत आहेत. तसेच पुणे या ठिकाणी काम करत असताना त्यांना पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदावर राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. सामाजिक कामाबरोबर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोबतच ते जोडले गेले असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे ही काम केले आहे. सामाजिक कामाची शिकवण देणारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची विचारधारा आत्मसात करून ते काम करत आहेत. रेनवडी सारख्या ग्रामीण भागातील अगदी छोट्या गावांमध्ये जन्म झाल्यामुळे गावातील प्रश्न व समस्या त्यांना माहिती आहे त्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ते काम करत आहेत.
आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून ग्रामस्तरावर ते विविध उपक्रम राबवत असून विकासाच्या योजना ही ते राबवत आहेत. गावात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय ओळखून त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त १५ गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप केली होती तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी ही ते नेहमी तत्पर असतात गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य ते करतात गावात विविध उपक्रम राबविणे मध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. येवले कुटुंब गावातील सामाजिक-राजकीय अध्यात्मिक कार्य मध्येही नेहमी अग्रेसर दिसून येते. दत्तात्रय येवले पारनेर तालुक्यांमध्ये आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून काम करत आहेत आमदार निलेश लंके यांचा त्यांना चांगला पाठिंबा असल्यामुळे ग्रामस्तरावर दत्तात्रय येवले यांचे सुरू असलेले काम हे चांगले आहे. गाव स्तरावर ही ते प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी या पुढील काळात कटिबद्ध आहेत. अशा या सामाजिक नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...