'ते' वक्तव्य पारनेर तालुक्यापुरतेच खासदार विखे यांचे स्पष्टीकरण पारनेर/प्रतिनिधी : राज्यात भाजप आणि शिवसेनेत टोकाचे राजकीय मतभेद नि...
'ते' वक्तव्य पारनेर तालुक्यापुरतेच खासदार विखे यांचे स्पष्टीकरण
पारनेर/प्रतिनिधी :
राज्यात भाजप आणि शिवसेनेत टोकाचे राजकीय मतभेद निर्माण झालेले असताना पारनेरमध्ये मात्र भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेगळाच निर्धार केला आहे. नंतर मात्र आपले हे वक्तव्य फक्त पारनेर तालुक्यापुरतेच सिमीत असल्याचे स्पष्टीकरण खा. विखे पाटील यांनी दिले.
पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात विखे पाटील यांनी पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता टीका करतानाच नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे चांगलेच कौतूक केले. डॉ. विखे पाटील म्हणाले, मी खासदार
म्हणून निवडून येण्यात ५० टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही.
मातोश्रीच्या विरोधात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही. माझे आजही हेच मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे, हे मी सांगत आहे, असे विखे म्हणाले होते.
पारनेरमधील वक्तव्य हे त्या तालुक्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर
होते. त्याचा राज्याच्या राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला गेला. जिल्ह्यात राजकीय निर्णय घेताना प्रदेश पदाधिकाऱ्यांचाच अंतिम आदेश मानला जाईल, अशी भूमिका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नंतर स्पष्ट केली आहे.
राजकीय परिस्थितीत पारनेर तालुक्याच्या शिवसैनिकांवर
होत असलेला अन्याय तसेच राज्यात आघाडी सरकार असतानाही पारनेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा होत नसलेला विचार पाहाता त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहाण्याची किंवा त्यांना बरोबर घेवून जाण्याच्या दृष्टीने आपण भाष्य केल्याचे खा. विखे म्हणाले. पारनेरची वस्तूस्थिती वरिष्ठांना सांगू असे ते म्हणाले.