वासुंदा ते वडगाव सावताळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम मार्गी रस्त्यासाठी आमदार निलेश लंकेच्या निधीतून ५१ लाख र...
वासुंदा ते वडगाव सावताळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम मार्गी
रस्त्यासाठी आमदार निलेश लंकेच्या निधीतून ५१ लाख रुपये
वासुंदे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य पोपट साळुंके व युवा नेते अमोल उगले
दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
लवकरच रस्ता होणार वाहतुकीसाठी खुला
पारनेर/प्रतिनिधी :
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रतिक्षेत असलेल्या वासुंदे ते वडगाव सावताळ या साडेतीन किलोमीटर डांबरी रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी ५१ लाख रुपये निधी दिला असुन या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ उदय बर्वे व ग्रामपंचायत सदस्य पोपट साळुंखे व माजी चेअरमन भागुजीदादा झावरे यांनी दिली आहे. वासुंदे ते वडगाव सावताळ या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक आणि येण्या-जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणार असून दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पण डॉ बाबासाहेब गांगड, दत्तात्रय साळुंके व निलेश उर्फ भालके यांनी दिली आहे.
यावेळी वासुंदे येथील विकास झावरे, पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, शासकीय ठेकेदार प्रविण वारूळे, अमोल उगले, भाऊसाहेब हिंगडे, संचालक रावसाहेब बर्वे, राहुल गायके, बबनराव गांगड यांच्या सह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. या डांबरी रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात आले असून पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा मानस शासकीय ठेकेदार वारूळे यांनी बोलून दाखवला आहे.
वासुंदे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खराबी वस्ती, तळेकर वस्ती, दाते वस्ती शिवार मालवाहतुकीसाठी व येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना या शेतकऱ्यांचे रहिवाशांना करावा लागत होता तर दुसरीकडे वडगाव सावताळ येथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना वासुंदे येण्या-जाण्यासाठी सर्वात जवळचा पर्यायी रस्ता असल्याने त्यांना सुद्धा फार मोठा अडचणीचा सामना करावा लागत होता. परंतु आमदार निलेश लंके यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याने वासुंदे व वडगाव सावताळ ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
आमदार लंकेकडुंन वासुंदे गावासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी : भागुजीदादा झावरे
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून यामध्ये प्रामुख्याने वडगाव सावताळ ते वासुंदा रस्त्यासाठी ५१ लाख रुपये, ७ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य १० लाख रुपयांचे "सोलर हायमॅक्स"सह इतर विकासकामांसाठी निधी दिला असून काही डांबरी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर भाऊसाहेब महाराजांच्या यात्रोत्सवास काळात मंडपासाठी ५१ लाख रुपयांची घोषणा आमदार निलेश लंके यांनी केली असून ग्रामपंचायत ठराव दिल्यानंतर लवकरच हा निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही मा. चेअरमन भागुजीदादा झावरे, ग्रामपंचायत सदस्य पोपट साळुंखे व अमोल उगले यांनी सांगितले आहे.
COMMENTS