शिवसेना पारनेर क्रमांक १ शाखा प्रमुख पदी गणेश चव्हाण स्थानिक पातळीवरील शिवसेना संघटना बळकट करणार गणेश चव्हाण यांची प्रतिक्रिया पारनेर/प्रति...
शिवसेना पारनेर क्रमांक १ शाखा प्रमुख पदी गणेश चव्हाण
स्थानिक पातळीवरील शिवसेना संघटना बळकट करणार
गणेश चव्हाण यांची प्रतिक्रिया
पारनेर/प्रतिनिधी :
शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तालुक्यात पदाधिकारी निवडी सध्या केल्या जात असून पारनेर क्रमांक १ च्या शिवसेना शाखा प्रमुख पदी शिवसेनेचे कट्टर व चिवट शिवसैनिक म्हणून तालुक्यात परिचित असलेले पारनेर शहरातील गणेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. शिवसंपर्क अभियानच्या अंतर्गत पारनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या सुपा या ठिकाणी झालेल्या बैठकीत गणेश चव्हाण यांची निवड करण्यात आली.
यावेळी पक्ष निरीक्षक खासदार गजानन किर्तिकर, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, सभापती काशिनाथ दाते, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहकले, पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेना पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे, युवा सेनाप्रमुख नितिन शेळके शिवसेना उपतालुका प्रमुख पंढरीनाथ मुंडे शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियंकाताई खिलारी पारनेर नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक नवनाथ सोबले यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गणेश चव्हाण म्हणाले की पारनेर शाखा प्रमुख पदी माजी निवड करून शिवसेना पक्ष संघटनेतील वरिष्ठांनी माझ्या कामाची दखल घेतली आहे. या पुढील काळात पक्षसंघटनेत काम करत असताना एक चिवट शिवसैनिक म्हणून मी नक्कीच काम करेल. पक्ष संघटना तालुक्यात व पारनेर शहरामध्ये बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून शिवसेनेचे माध्यमातून चांगले काम करेल.
वरिष्ठांच्या आदेशानुसार संघटना बळकट करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील.
दरम्यान गणेश चव्हाण यांची पारनेर क्रमांक १ शाखाप्रमुख पदी निवड झाल्यामुळे शिवसेना वाढीसाठी निश्चित फायदा होणार आहे. त्यामुळे यापुढील काळात गणेश चव्हाण हे पक्षसंघटनेत काम करून शिवसेना बळकट करण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील.