निघोज-आळकुटी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी तत्पर : सचिन पाटील वराळ लामखडे, वरखडे वस्ती परिसरात शाळा खोल्यांचे भूमिपूजन पारनेर प्रतिनिधी : ...
निघोज-आळकुटी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी तत्पर : सचिन पाटील वराळ
लामखडे, वरखडे वस्ती परिसरात शाळा खोल्यांचे भूमिपूजन
पारनेर प्रतिनिधी :
निघोज-अळकुटी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी आपण व आपले सहकारी सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी दिली आहे. निघोज परिसरातील लामखडे, वरखडे वस्ती (बजरंगनगर) येथील शाळा खोलीचे भुमिपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप पाटील वराळ यांनी जिल्हा परिषद माध्यमातून या शाळाखोलीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी वराळ बोलत होते. उपसरपंच माऊली वरखडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे, ग्रामपंचायत माजी सदस्य भिमराव लामखडे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, शंकर वरखडे, प्रतिक वरखडे, गोविंद लामखडे, शांताराम लामखडे, बाळासाहेब वरखडे, पोपट लामखडे, अर्जुन लामखडे, शिवाजी डेरे, विठ्ठल वरखडे, बजरंग वराळ, हरिभाऊ वरखडे, बाबाजी वरखडे, हरिभाऊ लामखडे, उत्तम लामखडे, नरसाळे गुरुजी, भास्कर वरखडे, सुभाष वरखडे, कैलास वरखडे, हरिष वरखडे, संतोष वरखडे, अक्षय वरखडे, सुनिल कुदळे, सौरभ वरखडे, शेखर वरखडे, महादेव पवार, मनोज ईधाटे, पोपटराव लंके, संदीप लामखडे, पाराजी लामखडे, एकनाथ लामखडे, सुदाम लामखडे, मच्छींद्र लामखडे, किरण वरखडे, नीलेश घोडे, आकाश वराळ, अस्लम इनामदार, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप पाटील वराळ यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामांचा पाठपुरावा केल्याने हे शक्य झाले आहे. सरपंच चित्रा वराळ व ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून गाव व परिसरात गेली दिड वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहेत. सचिन पाटील वराळ हेे सर्वांना सोबत घेऊन जाणारेे नेतृत्व आहे.
ज्ञानेश्वर वरखडे (उपसरपंच, निघोज ग्रामपंचायत)
COMMENTS