सचिन पाटील वराळ यांचे नेतृत्व विकासाभिमुख : डेरे पारनेर प्रतिनिधी : गेली पाच वर्षात संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन प...
सचिन पाटील वराळ यांचे नेतृत्व विकासाभिमुख : डेरे
पारनेर प्रतिनिधी :
गेली पाच वर्षात संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून लोकसंपर्कात सुद्धा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी बाजी मारली असल्याचे प्रतिपादन शिरसुले गावचे ज्येष्ठ नेते शिवाजी डेरे यांनी व्यक्त केले. शिरसुले गावातील दशक्रिया विधी घाट सुशोभीकरणसाठी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप पाटील वराळ यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला असून याचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्या मिरा घोगरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी किसनराव घोगरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी पाच वर्षात संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन माध्यमातून व पाठपुराव्यामुळे शिरसुले गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागल्याबद्दल फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांचा ग्रामस्थांच्यावतीने शिवराम घोगरे, गणेश लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच माऊली वरखडे, सुनिल घोगरे, रमेश घोगरे, भरत घोगरे, यादव घोगरे, लक्ष्मण मंडले, सोपान घोगरे, दत्ता घोगरे, बबनराव घोगरे, संदेश घोगरे, अंकुश घोगरे, शहाजी घोगरे, बाळू घोगरे, किसन घोगरे, भाऊ शेळके, संपत घोगरे, अमर घोगरे, अशोक मडले, रामेश्वर घोगरे, शिवाजी चौधरी, आनाजी घोगरे, दिलीप लंके, सागर घोगरे, महिंद्रा लंके, रामकृष्ण लंके, हौसाबाई घोगरे, रवी लंके, नीलेश घोडे, अस्लम इनामदार, गंगा वरखडे, आकाश वराळ आदी उपस्थित होते.
डेरे म्हणाले, सचिन पाटील वराळ यांच्या जनसंपर्काची झलक दि.९ जूनच्या मेळाव्यात दिसून आली असून तालुयातील नेत्यांनी या प्रचंड जनसमुदाय उपस्थित असलेल्या या मेळाव्याची दखल आवर्जून घेतली असून सचिन पाटील वराळ यांचे नेतृत्व विकासाभिमुख कामे परिसरात मोठ्या प्रमाणात झाली आहेत. याचीच साक्ष देत असल्याचे प्रतिपादन डेरे यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता घोगरे यांनी तर गणेश लंके यांनी आभार मानले.