बोकडाबरोबरच मोबाईलचीही चोरी; कडूस येथील घटना पारनेर प्रतिनिधी : शेळीपालन शेडच्या दरवाजाचे कुलूप तोडून बोकड चोरतानाच खिडकीत ठेवलेला मोबाईलही...
बोकडाबरोबरच मोबाईलचीही चोरी; कडूस येथील घटना
पारनेर प्रतिनिधी :
शेळीपालन शेडच्या दरवाजाचे कुलूप तोडून बोकड चोरतानाच खिडकीत ठेवलेला मोबाईलही अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची घटना कडूस येथे घडली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद चंद्रभान आगलावे यांचा कडूस येथील कणसे वस्तीवर शेळीपालन प्रकल्प आहे. दि. २१ जुन रोजी रात्री साडेदहा वाजता कणसे हे जेवण करून झोपले असता त्यानंतर २२ जून रोजी पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने शेळीपालन शेडच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. व तेथील दहा हजार रूपये किमतीचा बोअर प्रजातीचा बोकड चोरून नेला.
बोकड नेतानाच चोरटयाने खोलीच्या खिडकीमधून ५ हजार रूपये किमतीचा रेमडी एस ७ हा मोबाईलही लांबविला.
पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आगलावे उठून हे शेडजवळ गेले असता शेडच्या दरवाजाचे कुलूप तोडण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आज जाउन पाहिले असता बोअर प्रजातीचा बोकड तेथे आढळून आला नाही. तसेच खोलीच्या खिडकीत ठेवण्यात आलेल्या मोबाईचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता मोबाईलही चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजूबाजूला शोध घेऊनही बोकड मिळून न आल्याने आगलावे यांनी सुपे पोलिस ठाण्यात जाउन तशी फिर्याद दाखल केली.
आगलावे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरोधात शेळीपालनाचे कुलूप तोडून ते उघडे सोडून निघून जाणे तसेच चोरीच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.