सुजित झावरे यांच्या हातात सत्ता नसताना विकासाची घोडदौड सुरूच लोणी हवेली व पानोली येथे उद्या विकास कामांचे भूमिपूजन पारनेर प्रतिनिधी : तालुक...
सुजित झावरे यांच्या हातात सत्ता नसताना विकासाची घोडदौड सुरूच
लोणी हवेली व पानोली येथे उद्या विकास कामांचे भूमिपूजन
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील पानोली व लोणी हवेली येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ होणार आहे. पानोली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी मा. जि. प. सदस्य आझाद ठुबे हे प्रमुख उपस्थित राहणार असून ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
दरम्यान पानोली येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या १५ लक्ष रु. साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन रविवार दि. २६ सकाळी ८.३० वाजता होणार आहे. तसेच लोणी हवेली येथे खडक वस्ती श्री हनुमान मंदिर सभा मंडप बांधणे ५ लक्ष रुपये, कोल्हे वस्ती अंगणवाडी इमारत बांधणे ८.५० लक्ष रुपये विकासकामांचा भूमिपूजन समारंभ रविवार दि. २६ सायं ५.०० वाजता सुजीत झावरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही प्रकारची सत्ता हातात नसताना तालुक्यात विकास कामांच्या माध्यमातून काम करत असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे पाटील पारनेर तालुक्याला विकासाच्या दिशेने घेऊन जात आहेत. पानोली येथे जलसंधारण करण्यासाठी साठवण बंधारा तर लोणी हवेली येथे हनुमान मंदिर सभामंडप व प्राथमिक शाळाखोल्या मंजूर करून तालुक्यातील सत्ताधारी गटाला सुजीत झावरे पाटील यांनी सत्ता नसताना विकास कामे कशी करायची हे दाखवून दिले आहे.