पारनेर युवासेनेच्या उपतालुका प्रमुख पदी शुभम कळमकर युवकांच्या माध्यमातून शिवसेना तालुक्यात बळकट : पंढरीनाथ उंडे पारनेर/प्रतिनिधी (गणेश जगदाळ...
पारनेर युवासेनेच्या उपतालुका प्रमुख पदी शुभम कळमकर
युवकांच्या माध्यमातून शिवसेना तालुक्यात बळकट : पंढरीनाथ उंडे
पारनेर/प्रतिनिधी (गणेश जगदाळे) :
सुपा येथे झालेल्या शिवसेनेच्या संपर्क अभियान बैठकीमध्ये तालुक्यातील कळमकरवाडी येथील युवा नेतृत्व कट्टर कडवे शिवसैनिक असलेले शुभम बापूराव कळमकर यांची युवासेनेच्या पारनेर तालुका उपप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. शिव संपर्क अभियान बैठकीच्या कार्यक्रम प्रसंगी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व पारनेर तालुक्याचे कार्यसम्राट नेतृत्व मा. आमदार विजयराव औटी साहेब, खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले साहेब, जिल्हा परिषद समितीचे सभापती काशिनाथ दाते सर, शिवसेना पारनेर तालुका अध्यक्ष बंडू रोहोकले, पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके, शिवसेना उपतालुका प्रमुख पंढरीनाथ उंडे, शिवसेना महिला अध्यक्षा प्रियंकाताई खिलारी,
शिवसेना युवा सेना तालुका प्रमुख नितीनदादा शेळके युवा सेना तालुका संघटक दीपक उंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा नेतृत्व कळमकर वाडी येथील कट्टर शिवसैनिक शुभम कळमकर यांना युवासेना उपतालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी शुभम कळमकर यांना पुढील राजकीय सामाजिक व पक्ष संघटनेतील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शुभम कळमकर म्हणाले की युवा सेना तालुका उपप्रमुख पदी माजी निवड करून शिवसेना पक्ष संघटनेतील वरिष्ठांनी माझ्या कामाची दखल घेतली आहे. या पुढील काळात पक्षसंघटनेत काम करत असताना एक चिवट शिवसैनिक म्हणून मी नक्कीच काम करेल. पक्ष संघटना तालुक्यात बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून शिवसेनेचे युवा सेनेच्या माध्यमातून तालुक्यात जाळे निर्माण करेल.
वरिष्ठांच्या आदेशानुसार संघटना बळकट करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील.
दरम्यान शुभम कळमकर यांची युवासेनेच्या संघटनेच्या उपतालुकाप्रमुख पदी निवड झाल्यामुळे शिवसेना वाढीसाठी निश्चित फायदा होणार आहे. त्यामुळे यापुढील काळात शुभम कळमकर हे पक्षसंघटनेत काम करून शिवसेना युवा सेना ही तालुक्यात बळकट करण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील.
पारनेर तालुक्यात शिवसेना युवासेनेमध्ये अनेक युवक सहभागी होत असून शिवसेना संघटना अधिक बळकट होत आहे. युवकांच्या माध्यमातून पक्ष संघटना तालुकास्तरावर भक्कम झाली असून शिवसेना नेते माजी आमदार विजयराव औटी साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व युवासेना तालुक्यात चांगले काम करत आहे. शुभम कळमकर यांची उपतालुकाप्रमुख पदी निवड करून पक्षाने एका चांगल्या युवकाला संघटनेमध्ये काम करण्याची पदाधिकारी म्हणून संधी दिली आहे.
पंढरीनाथ उंडे (उपतालुका प्रमुख शिवसेना, पारनेर)