यापुढील निवडणुका पक्षा, पेक्षा व्यक्ती पाहून होतील : सुजीत झावरे पाटील पानोली येथे १५ लक्ष रुपये साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन तालुक्यात सहमती ए...
यापुढील निवडणुका पक्षा, पेक्षा व्यक्ती पाहून होतील : सुजीत झावरे पाटील
पानोली येथे १५ लक्ष रुपये साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन
तालुक्यात सहमती एक्सप्रेस धावणार ? सर्वपक्षीय नेते एकत्र
पारनेर प्रतिनिधी :
पानोली येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याचा भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद माजी सदस्य आझाद ठुबे तसेच युवा नेते राहुल पाटील शिंदे व पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. बंधाऱ्यासाठी गेले अनेक वर्षापासूनची ग्रामस्थांची मागणी होती. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर बंधाऱ्यासाठी १५.००लक्ष रु. मंजूर करून दिले. सदर बंधाऱ्याला निधी उपलब्ध झाल्याने गाडेकर मळा तसेच भगत मळा दोन्ही भागातील शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व पक्षीय लोक उपस्थितीत होते.
प्रामुख्याने सुजीत झावरे पाटील यांच्यासोबत या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त पानोली येथील राष्ट्रवादीसोबतचे झावरे यांचे जुने सहकारी कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये दिसून आल्यामुळे तालुक्यात हा एक राजकीय दृष्टीने चर्चेचा विषय ठरला आहे.
यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, सद्याच्या वातावरणात कोणता राजकीय पक्ष कोणा बरोबर आघाडी किंवा युती करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सामान्य माणसाला नेमक कोणा बरोबर जावं हा प्रश्न पडन सहाजिकच आहे. त्यामुळं या पुढील काळातील निवडणुका या पक्षा, पेक्षा व्यक्ती कडे पाहून होतील असे वाटते
असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना आझाद ठुबे म्हणाले की पानोली गावच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पानोली गावामध्ये आज अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी युवा नेते अमोल मैड, सतीश पिंपरकर, बी. ए. भगत, मारूती गायकवाड, दादाभाऊ वारे, इंद्रभान गाडेकर, संजय भगत, शशिकांत भगत, बाळासाहेब गाडेकर, श्यामराव गाडेकर, कुंडलिक भगत, शिवाजी पवार, भागवत गायकवाड, स्वप्नील गायकवाड, अंकुश गायकवाड, दादाभाऊ शिंदे, हरिभाऊ गायकवाड, संदीप शिंदे, भानुदास शिंदे, आर डी शिंदे, रामदास शिंदे, शरद गायकवाड, उमेश गायकवाड, श्यामराव गायकवाड, पानोली गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
तालुक्यात सहमती एक्सप्रेस धावणार का ? सर्वपक्षीय नेते एकत्र
पानोली येथे विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी कम्युनिस्ट विचारसरणीचे आझाद ठुबे, भारतीय जनता पार्टीचे सुजीत झावरे पाटील, राहुल शिंदे पाटील, अमोल मैड व शिवसेना नेते पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे हे विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने तालुक्यात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे या कार्यक्रमांमध्ये झावरे यांचे राष्ट्रवादी चे जुने सहकारीही दिसून आले. त्यामुळे तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सहमती एक्सप्रेस धावणार का ? तसे झाल्यास राजकीय चित्र बदलू शकते.