माळकुप सेवा सोसायटी सुजित झावरे पाटील गटाकडे जनसेवा सहकार पॅनलचा दणदणीत विजय स्वप्निल राहिंज सर्वाधिक मताधिक्याने विजयी पारनेर प्रतिनिधी : ...
माळकुप सेवा सोसायटी सुजित झावरे पाटील गटाकडे
जनसेवा सहकार पॅनलचा दणदणीत विजय
स्वप्निल राहिंज सर्वाधिक मताधिक्याने विजयी
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील महत्त्वपूर्ण माळकुप सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया गुरुवार दि. ९ रोजी पार पडली या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या गटाने या विजय मिळविला. जनसेवा सहकार पॅनल व ग्रामविकास शेतकरी पॅनल त्यांच्यामध्ये समोरासमोर लढत झाली या निवडणुकीत जनसेवा सहकार पॅनलला ९ जागा तर ग्रामविकास शेतकरी पॅनलला ४ जागा मिळाल्या या निवडणुकीमध्ये जनसेवा सहकार पॅनलने ९ जागा जिंकत सेवा सोसायटी वर झेंडा फडकवला आहे.
जनसेवा सहकार पॅनलचे विजयी उमेदवार : अशोक काळे, तबाजी काळे, राजू नाबगे, राधु नाबागे, बाबासाहेब शिंदे, सुदाम शिंदे, सुजित घंगाळे, संभाजी नाबगे, स्वप्निल राहिंज, हे उमेदवार विजयी झाले तर ग्रामीण विकास शेतकरी पॅनलचे चार उमेदवार सुखदेव नाबगे, विजय नाबगे, सिंधू शिंदे, राजश्री चत्तर, यांचा या निवडणुकीत विजय झाला.
माळकुप सेवा सोसायटीची ही निवडणूक अतिशय चुरशीची बनली होती. सुजीत झावरे पाटील यांचे सहकारी स्वप्निल राहिंज यांनी माळकूप माजी सरपंच विठ्ठल लष्कर यांचा निवडणुकीत दारुण पराभव केला. या निवडणुकीमध्ये जनसेवा सहकार पॅनल विजयी होण्यासाठी उपसरपंच राहुल घंगाळे, संंतोष राहिंज, जयसिंग नाबगे, गोरक्षनाथ ठुबे, मा.चेअरमन कुंडलिक नाबगे, एकनाथ नाबगे, विलास नेव्हे, मा.उपसरपंच राजेंद्र नाबगे, अशोक शिंदे, अनिल शिंदे, विश्वास नेव्हे, मधूकर शिंदे, शिवाजी शिंदे, विठ्ठल नाबगे, चंद्रकांत कुसाळकर, मा.चेअरमन. भानुदास नाबगे,
पोपटराव नाबगे, मा.सरपंच सुदाम पंडित, बाळासाहेब नाबगे, विलास शिंदे, भास्कर नाबगे, रावसाहेब नाबगे, पांडुरंग नाबगे, संतोष कदम, भाऊसाहेब गवळी, शिवशंकर शिंदे, शरद नाबगे, शिवाजी काळे, शिवराम शिंदे, अशोक राहिंज, प्रकाश पंडित, सुरेश पंडित, अर्जुन लष्करे यांचे या निवडणुकीमध्ये विशेष सहकार्य लाभले.
स्वप्निल राहिंज यांचा विक्रमी मतांनी विजय
माळकुप सेवा सोसायटी मध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे जवळचे सहकारी व कौटुंबिक स्नेही युवानेते स्वप्निल राहिंज यांचा या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्याने विजय झाला त्यांनी माजी सरपंच विठ्ठल लष्करे यांना अस्मान दाखवले. या विक्रमी विजयाने स्वप्निल राहिंज यांचे चांगले नेतृत्व समोर आले आहे. दणदणीत विजयानंतर स्वप्निल राहिंज यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
.