'निराधार'साठी कागदपत्रे जमविताना वृद्धांची दमछाक पारनेर प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजणनेच्या लाभार्थींची कागदपत्रे मिळविण्यास...
'निराधार'साठी कागदपत्रे जमविताना वृद्धांची दमछाक
पारनेर प्रतिनिधी :
संजय गांधी निराधार योजणनेच्या लाभार्थींची कागदपत्रे मिळविण्यासाठी मोठी दमछाक झाली आहे. तहसील कार्यालय ग्रामपंचायत, झेरॉक्स व सेतू कार्यालय त्या नंतर बँक असे हेलपाटे मारताना वयोवृद्ध व दिव्यांगाचे पुरते हाल झाले आहेत. अनेकांनी घरातील तरूणांही या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी कामाला लावले आहे. मात्र अता अनेक जाचक अटी आल्याने तालुक्यातील काही लाभार्थी अपोआप कमी होण्याची शक्यातही आहे. त्यामुळे सरकारचा आर्थिक फायदा होण्याची चिन्ह दिसत आहेत.
सराकारी नियमानुसार व योजनेच्या अटी व कायद्यानुसारच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एक जानेवरी ते ३१ मार्च अखेर योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी हयात असल्याचा दाखला, अधार कार्ड झेरॉक्स, बँकखाते पासबुकची झेरॉक्स,व उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात येते. जर त्यांनी या कालवधीत ही कागदपत्रे जमा केली नाही तर त्यांना सवलत म्हणून १ एप्रील ते ३० जून अखेर ही कागदपत्रे देणे बंधनकारक केले आहे. अन्यथा ३० जून नंतर या योजनेचा लाभ संबधीत लाभार्थ्यांना बंद करण्यात येईल असे या योजनेच्या नियमावलीतच नमूद केले आहे. त्यामुळे अता या लाभार्थ्यांना ही कागदपत्रे देणे बंधनकारक झाले आहे.
मात्र या योजनेत समाविष्ट असलेले बहुतेक लाभार्थी वयोवृद्ध आहेत. त्यांना ही कागदपत्रे जमा करणे जिकरीचे काम झाले आहे. त्यातही हयातीच्या दाखल्या साठी ग्रामसेवक तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठी यांची भेट होणे अवघड झाले आहे. कारण अनेकदा ग्रामसेवक, तलाठी गावात भेटतच नाहीत. भेटले तरीही त्यांना अता अवास्तव पैसे देऊन हे दाखले घ्यावे लागत आहेत. या शिवाय पुन्हा बँकेत चकरा माराव्या लागतात हे वेगळेच. या योजनेत समाविष्ट असलेले बहुतेक वयोवृद्ध यांना काहींना चालता येत नाहीत तर काहिंना दिसत नाही तर काहिंना ऐकू येत नाही. अशा अवस्थेत अता ही कामे करणे त्यांच्या द्रुष्टीने कठीण काम झले आहे. तसेच अनेक गावात वाहनांची सोय नाही. मात्र लाभा मिळविण्यासाठी ही कागदपत्रे देण्याशिवाय पर्याय नसल्याने अनेक बँकां ग्रामपंचायत तसेच तलाठी कार्यालयासमोर अशा वृद्ध लाभार्थींचे घोळके दिसत आहेत.
सरकारी आदेशानुसार संजयगांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी हयातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधार कार्ड व लाभार्थीचे ज्या बँकेत खाते आहे त्या खाते पुस्तकाची झेरॉक्स देणे बंधनकारक आहे. दरवर्षीच ही कागदपत्रे जमा करण्यात येतात त्यात नविन असे काही नाही. आम्ही सरकारी आदेशानुसारच काम करत आहोत.
प्रियंका पाचरणे, नायब तहसीलदार संजय गांधी निराधार योजना
लाभार्थी कमी होण्याची शक्यता
अनेकांनी बोगस दाखले घेऊन कमी उत्पन्न दाखविले आहे. तसेच काहींनी तर बनावट अधार कार्ड तयार करून त्यावर जन्म तारीख वाढवून घेतल्या आहेत. त्यामुळे अता अधार कार्ड तपासणीत व कमी उत्पन्नाचे दाखले मिळवण्यात आडचणी येणार आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी कमी होण्याची शक्याता आहे.