वेब टीम : मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या निर्देश दिले होते. याला शिवसेनेचे मुख्...
वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या निर्देश दिले होते. याला शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी दाखल केली होती. यावर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने फ्लोअर टेस्ट संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने तिन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल देण्यासाठी अर्ध्या तास घेतला होता.
त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे लाईव्ह आले. त्यांनी सोशल मीडिया वरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले.
विधानसभा फ्लोअर टेस्ट संदर्भात सर्वोच न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.