मन प्रसन्न करण्यासाठी ईश्वरभक्ती प्रेरणादायी : ऍड. बाबासाहेब खिलारी पाटील आषाढी एकादशीनिमित्त पिंपळनेर येथे भाविकांची गर्दी पारनेर प्रतिनिधी...
मन प्रसन्न करण्यासाठी ईश्वरभक्ती प्रेरणादायी : ऍड. बाबासाहेब खिलारी पाटील
आषाढी एकादशीनिमित्त पिंपळनेर येथे भाविकांची गर्दी
पारनेर प्रतिनिधी :
आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची देवदर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन ऍड. बाबासाहेब खिलारी पाटील, अहमदनगर सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे, मा. मुख्याध्यापक प्रकाशराव इघे सर यांनी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पिंपळनेर या ठिकाणी संत निळोबारायांचे दर्शन घेतले.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त अजिंक्य अशोकराव सावंत यांनी त्यांचा मान सन्मान केला.
आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पिंपळनेर या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी आले होते.
यावेळी बोलताना पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हा चेअरमन ऍड. बाबासाहेब खिलारी पाटील म्हणाले की संत निळोबाराय यांचे पिंपळनेर येथील देवस्थान हे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धेचे स्थान असून आषाढी एकादशी निमित्त राज्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनाला येतात देवाची भक्ती मनोभावे केल्यानंतर जो आनंद व प्रसन्नता मिळते ते शब्दांमध्ये व्यक्त न करण्यासारखे असते. पिंपळनेर देवस्थान मुळे पारनेर तालुक्याला खऱ्या अर्थाने राज्यांमध्ये ओळख मिळाली आहे.