निलेश लंके विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गैरहजर आमदार लंकेची गैरहजरी राष्ट्रवादीसाठी काय सांगून गेली पारनेर प्रतिनिधी : महाराष्ट्रात स...
निलेश लंके विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गैरहजर
आमदार लंकेची गैरहजरी राष्ट्रवादीसाठी काय सांगून गेली
पारनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालत झाल्यामुळे सत्तांतर झाले असून उद्धव ठाकरे यांना धोबीपछाड देत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडले असताना भाजपने शिवसेनेला मास्टर स्ट्रोक देत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लावली त्यानंतर लगेच विधानसभेचे रिक्त असलेल्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लागल्या नंतर झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये राज्यातील काही मतदारसंघांमधील विधानसभा सदस्य हे अनुपस्थित होते.
यामध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून गेल्याचे दिसते.
आजारपणाचे कारण देत निलेश लंके हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे परंतु पारनेर तालुक्यातील विविध कार्यक्रमांमध्ये निलेश लंके यांची उपस्थिती दिसून आल्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये ते उपस्थित का राहिले नाही हा प्रश्न निर्माण झाला असून. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपल्या आमदारांसाठी निवडणुकीदरम्यान व्हीप वाजवला असतानाही निलेश लंके हे विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान मतदानावेळी सभागृहामध्ये अनुपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पारनेर मतदारसंघांमध्ये काम करत असलेले आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादीचा एक युवा आक्रमक चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये ओळखले जातात. पक्षाच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळाली परंतु आजारपणाची किरकोळ कारण पुढे करत त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये दाखवलेली अनुपस्थिती ही तालुक्यात व जिल्ह्यात व सभागृहामध्ये चर्चेचा विषय ठरली असून निलेश लंके यांच्याशी संपर्क केला असता अनुपस्थित राहण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती समोर आली नाही.
उद्या बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार ?
आमदार निलेश लंके हे आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकी दरम्यान सभागृहामध्ये अनुपस्थित राहिल्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी निलेश लंके उपस्थित राहणार का? ही चर्चा आता मतदारसंघात व राजकीय जाणकारांमध्ये सुरू झाली आहे.
निलेश लंके हे विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये अनुपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चां सुद्धा आता झडू लागल्या आहेत.
त्यामुळे या सर्व विषयावर आमदार निलेश लंके आता काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्व राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
आजच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुणी मतदान केलं नाही
• अनुपस्थित सदस्य
1) नवाब मलिक राष्ट्रवादी
2) अनिल देशमुख राष्ट्रवादी
(3) निलेश लंके राष्ट्रवादी
(4) दिलीप मोहिते राष्ट्रवादी
5 ) दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी
6 ) अण्णा बनसोडे राष्ट्रवादी
7] बबनदादा शिंदे राष्ट्रवादी
8) नरहरी झीरवळ (अपवाद मतदान करू शकत नाहीत)
9] मुक्ता टिळक- भाजप
10 ) लक्ष्मण जगताप-भाजप
11) मुफ्ती इस्माईल एमआयएम
12 ) प्रणिती शिंदे काँग्रेस
13 ) रणजित कांबळे- काँग्रेस
14) रमेश लटके ( निधन)
15 ) अबू आझमी- सपा
16 ( रईस शेख- सपा
17] शाह फारुख अनवर एमआयएम