गोरगरिबांचे कैवारी आदिवासींचा आधार भाऊसाहेब शिंदे पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील दुर्गम अशा वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण भागामध्ये आ...
गोरगरिबांचे कैवारी आदिवासींचा आधार भाऊसाहेब शिंदे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील दुर्गम अशा वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण भागामध्ये आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात खऱ्या अर्थाने संघर्षमय पद्धतीने केली ते म्हणजे गोरगरिबांची कैवारी, सर्वसामान्यांचे आधार वडगाव सावताळचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे होय.
भाऊसाहेब शिंदे हे एक सामाजिक व्यक्तिमत्व असून समाजासाठी काम करत राहणे गोरगरीब, आदिवासी, दिन दलित दुबळ्या जनतेची सेवा करणे हे ब्रीद घेऊनच ते समाजसेवेचे काम करत आहे. समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये अनेक विविध सामाजिक धार्मिक अध्यात्मिक उपक्रम राबवले आहेत.
त्यामुळे भाऊसाहेब शिंदे हे एक संघर्षशील नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. समाजामध्ये काम करत असताना समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेला दिसतो.
वडगाव सावताळ या ठिकाणी काम करत असताना गावच्या आध्यात्मिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग दिसतो. वडगाव सावताळ मध्ये ग्रामविकासाची मोठी चळवळ त्यांनी उभी केली आहे. त्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ते शासन दरबारी नेहमीच भांडत असतात. वडगाव सावता सारख्या ग्रामीण भागाला खऱ्या अर्थाने एक वेगळी उंची प्राप्त करून देण्यासाठी भाऊसाहेब शिंदे लढत आहेत.
सामाजिक हित जोपासण्यासाठी भाऊसाहेब शिंदे यांनी कोरोना काळात गोरगरीब घटकातील लोकांना आधार देण्याचा प्रयत्न केला त्यांनी पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वासुंदे, पिंपळगाव रोठा, पळसपुर, खडकवाडी, वडगाव सावताळ या ठिकाणी कोरोना काळामध्ये किराणा साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले तसेच आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. आपल्या वडगाव सावताळ गावातच त्यांनी कोरोना सेंटर उभे करून त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा ही केली. कोरोना सेंटर साठी कोणत्याही प्रकारची कमतरता पडू नये यासाठी त्यांनी भरीव मदत करण्याचा प्रयत्न केला. टाकळी ढोकेश्वर परिसरामध्ये त्यांनी आधार कॅम्प घेऊन खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची आधार कार्ड काढण्यासाठी होणारी हेळसांड थांबवली आहे.
भाऊसाहेब शिंदे हे काम करत असताना त्यांनी विद्यार्थी, युवक, महिला यांच्यासाठी ही समाजामध्ये विविध उपक्रम राबवले विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे वडगाव सावताळ येथील श्रीक्षेत्र सावताळबाबा देवस्थान साठी त्यांनी नेहमीच मदत केली आहे. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनाही त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच ते सढळ हाताने मदत करत असतात.
सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारे हे व्यक्तिमत्व निश्चितच समाजाच्या हितासाठी काम करत आहे.
भाऊसाहेब शिंदे हे सर्वसामान्य लोकांना आपल्यातीलच वाटतात त्यामुळे ते पारनेर तालुक्यामध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून पुढे येत आहे. सर्व घटकातील लोकांसोबत त्यांच्या असलेले महत्त्वपूर्ण संबंध हे निश्चितच त्यांच्या भविष्यातील राजकीय सामाजिक वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.