कोरठणला १३ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव; प्रशासन सज्ज पारनेर प्रतिनिधी : राज्यस्तरीय 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र आणि लाखो भक्तांचे कुलदैवत, ...
कोरठणला १३ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव; प्रशासन सज्ज
पारनेर प्रतिनिधी :
राज्यस्तरीय 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र आणि लाखो भक्तांचे कुलदैवत, श्रद्धास्थान असलेले पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील कोरठण खंडोबा देवस्थान बुधवारी (दि.१३) आषाढ गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले आहे. यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. स्वामी गगनगिरी महाराजांच्या मूर्तीची खंडोबा देवस्थानातील ध्यानमंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून गुरुपौर्णिमेला उत्सवाचे आयोजन केले जाते.
कोरोना काळात गुरुपौर्णिमा उत्सव झाला नाही. यावर्षी भाविकांत मोठा उत्साह बहरलेला असून, गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. सकाळी सहा वाजता खंडोबा मंगल स्नान, साज शृंगार, सकाळी सात वाजता अभिषेक पूजा, सकाळी आठ वाजता महाआरती, सकाळी नऊ वाजता खंडोबा पालखी मिरवणुकीने मंदिर प्रदक्षिणा, सकाळी १० वाजता गुरुपौर्णिमा प्रवचन व सत्संग लोकेशानंदगिरी महाराज (आंबेगव्हाण), सकाळी ११.३० वाजता महाप्रसाद अन्नदान मारुती चिमाजी गुंजाळ परिवारातर्फे देवदर्शन, पालखी सोहळा, गुरुपौर्णिमा, प्रवचन सत्संग आणि महाप्रसाद अन्नदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे अॅड. पांडुरंग गायकवाड, गंगाराम बेलकर, महेंद्र नरड, मनीषा जगदाळे, हनुमंत सुपेकर, किसन धुमाळ, अश्विनी थोरात, किसन मुंढे, दिलीप घोडके, मोहन घनदाट, चंद्रभान ठुबे, अमर गुंजाळ, साहेबा गुंजाळ, देविदास क्षीरसागर यांनी केले.
COMMENTS