शाहू महाराजांनी सामाजिक व शैक्षणिक चळवळ रूजविली - झावरे टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी : राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक शैक्षणिक चळवळ सम...
शाहू महाराजांनी सामाजिक व शैक्षणिक चळवळ रूजविली - झावरे
टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक शैक्षणिक चळवळ समाजात रूजवुन एक नवीन आदर्श समाजाची उभारणी केली आहे त्याचे दोतक म्हणून आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संकल्पनेतून रयत शिक्षण संस्था उभी राहून एक नवीन शैक्षणिक क्रांती केले असल्याची गौरवोद्गार विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन नारायण झावरे यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी पुढे बोलताना झावरे म्हणाले की,कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्याला शिक्षणाची दारी खुली करून दिली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींना शिक्षणाची संधी या निमित्ताने प्रयत्न उपलब्ध करून दिली आहे. या गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी जी काही सर्वोत्तरी मदत करण्याचे आश्वासन नारायणराव झावरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना उघडून दाखवला.
शालाबाह्य मुले व सक्तीचे शिक्षण ही संकल्पना छत्रपती शाहू महाराजांची असून ती २०० वर्षांनी आजच्या समाजाला कळली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी नारायण झावरे तर व्हा.चेअरमनपदी मोहनराव रांधवन यांची निवड झाल्याबद्दल कन्या विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रोकडे यांनी केले तर आभार ठुबे यांनी केले.यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष पंडितराव झावरे सेवा संस्थेचे व्हा.चेअरमन मोहनराव रांधवन,
प्राचार्य सिताराम ढुस सर,माजी मुख्याध्यापक प्रकाशराव इघे सर, अंकुश पायमोडे, दत्ता निवडुंगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे सुदाम शिर्के संचालक श्रावण गायकवाड, मोहन रोकडे,किसन धुमाळ आदी उपस्थित होते.