उद्धवजी ठाकरे यांचा पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांशी संवाद पारनेर/प्रतिनिधी : शुक्रवार दिनांक १५ जुलै २०२२ सकाळी ११ वाजता पारनेर येथे झालेल्...
उद्धवजी ठाकरे यांचा पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांशी संवाद
पारनेर/प्रतिनिधी :
शुक्रवार दिनांक १५ जुलै २०२२ सकाळी ११ वाजता पारनेर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्याच्या वेळी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी मातोश्रीवर मोबाईल द्वारे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला त्यावेळी मोबाईल द्वारे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना श्री उद्धव ठाकरे म्हणाले की आज माझ्या हातात तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही.
आपल्याला अग्निपथावरून चालायचं आहे पाय भाजतील त्रास होईल संघर्ष करावा लागेल तुम्ही सर्वजण तयार असाल तर हो म्हणा. त्यावेळी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना जमलेल्या सर्व शिवसैनिकांनी एक दिलाने आम्ही तुमच्या अजन्म सोबत आहोत काळजी करू नका असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुखांना दिला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी आपापल्या भावना व्यक्त करून कुठल्याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकट पडू न देण्याची शपथ घेतली यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मी लवकरच आपल्या भेटीला येत आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या शिवसेनेची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे.
धनुष्यबाण आपला होता, आपला आहे, आणि आपलाच राहणार आहे. असे उदगार काढताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अचानक झालेले या संवादांने सर्व शिवसैनिक आनंदी झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले
मेळाव्यास शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, सभापती गणेश शेळके, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, शिवसेना युवा तालुका प्रमुख नितीन शेळके, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्करराव शिरोळे, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, शिवसेना शहर प्रमुख निलेश खोडदे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियंकाताई खिलारी, नगरसेवक राजू शेख, उद्योजक पोपटराव चौधरी, उपतालुकाप्रमुख पंढरीनाथ उंडे, संतोष शेठ येवले, तुषार बांगर, किसनराव सुपेकर, जयसिंग धोत्रे, डॉ. कोमल भंडारी,
माजी नगराध्यक्ष वर्षा नगरे, चेअरमन उमेश औटी, चेअरमन सखाराम बुगे, चेअरमन रामदास कावरे, नगरसेवक भाऊ ठुबे, ऋषी गंधाडे, कांतीलाल ठाणगे, शिवसेनेचे सर्व विभाग प्रमुख, गटप्रमुख,गणप्रमुख, शाखाप्रमुख उपस्थितीत होते
.