टाकळी ढोकेश्वरमधून हिरो होंडा मोटारसायकल लांबविली पारनेर प्रतिनिधी : रात्रीच्या वेळी घराशेजारील जनावरांच्या गोठ्यात लावण्यात आलेली हिरो हो...
टाकळी ढोकेश्वरमधून हिरो होंडा मोटारसायकल लांबविली
पारनेर प्रतिनिधी :
रात्रीच्या वेळी घराशेजारील जनावरांच्या गोठ्यात लावण्यात आलेली हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबविली. टाकळीढोकेश्वर गावात ही घटना घडली.
नामदेव तुळशीराम ठुबे (वय ४९ रा. टाकळीढोकेश्वर ) यांनी दि. २६ रोजी सायंकाळी त्यांच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र. एम. एच.१६ ए.जी. ८५७९) लावली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करून ते घरामध्ये झोपले होते. रात्री ९ ते दि. २७ जूनच्या सकाळी साडेसहाच्या दरम्यान गोठ्यामध्ये लावण्यात आलेली अज्ञात इसमाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लांबविली.
सकाळी साडेसहा वाजता उठल्यानंतर ठुबे हे गोठ्याकडे गेले
असता तेथे लावण्यात आलेली मोटारसायकल मिळून आली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेण्याचा • प्रयत्न केला परंतू त्यात त्यांना यश आले नाही. गावामध्येही त्यांनी चौकशी केली परंतू शोध लागू शकला नाही. त्यामुळे अज्ञात चोरांनी मोटारसायकल चोरून नेल्याची त्यांची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी टाकळीढोकेश्वर दुरक्षेत्रात जाऊन मोटारसायकल चोरी झाल्याची माहीती दिली. पोलिसांनी त्याची शहानिशा करून पारनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीची फिर्याद दाखल केली. पो. ना. थोरात यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत पंचनामा केला. त्यानंतर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक थोरात हे पुढील तपास करीत आहेत.