स्व. पांडुरंग विठोबा दाते यांचे प्रथम पुण्यस्मरण पारनेर प्रतिनिधी : वासुंदे येथील जुन्या पिढीतील शेतकरी कष्टकरी समाजातील जुने जाणते सर्वसा...
स्व. पांडुरंग विठोबा दाते यांचे प्रथम पुण्यस्मरण
पारनेर प्रतिनिधी :
वासुंदे येथील जुन्या पिढीतील शेतकरी कष्टकरी समाजातील जुने जाणते सर्वसामान्य व्यक्तिमत्व स्वर्गीय पांडुरंग विठोबा दाते यांना आपल्यातून जाऊन वर्ष झाले. त्यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम रविवार दि. ३ जुलै रोजी वासुंदे येथे साईप्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहे.
दाते कुटुंबाच्या वतीने यावेळी अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी दहा ते अकरा या वेळेत ह. भ. प. भागवताचार्य रमेश महाराज कुलकर्णी यांची प्रवचन सेवा होणार आहे.
स्व. पांडुरंग विठोबा दाते हे शिस्तप्रिय तसेच विनोदी व्यक्तिमत्व होते. जुन्या काळामध्ये त्यांनी पैलवान म्हणूनही नावलौकिक मिळविला. शेतकरी म्हणून जीवन जगत असताना अतिशय कष्टप्रद आपल्या कुटुंबाची उभारणी केली. त्यांना पत्नी तीन मुले शंकर दाते, बाळासाहेब दाते, हनुमंत दाते तसेच सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून आज मुले विविध पदांवर कार्यरत आहेत. मोठा मुलगा शंकर दाते देशसेवेसाठी कार्यरत असून बाळासाहेब दाते हनुमंत दाते ही राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. वासुंदे गावातील एक आदर्श कुटुंब म्हणून दाते कुटुंबाला ओळखले जाते. स्व. पांडुरंग विठोबा दाते यांनी आपल्या कुटुंबाला चांगले संस्कार करून कुटुंब उभारले आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाला आपल्यातून जाऊन एक वर्ष होत असल्यामुळे त्यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सर्व नातेवाईक हितचिंतक वासुंदे येथील ग्रामस्थ यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.