जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुलदादा बेनके वाढदिवस विशेष पदाचा वापर प्रतिष्ठेकरता न करता जनहितासाठी करीत कर्तव्याचं भान असणारा तरूण ...
जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुलदादा बेनके वाढदिवस विशेष
पदाचा वापर प्रतिष्ठेकरता न करता जनहितासाठी करीत कर्तव्याचं भान असणारा तरूण नेता
शब्दांकन/अॅड विजय भिका कुऱ्हाडे
जुन्नरच्या इतिहासात अनेक नेते होवून गेले, अनेक पक्षांचे अनेक विचारांचे. अनेकांनी अनेकानेक पदं भुषवली, राजकारण करीत समाजकारणात योगदान दिलं. सबंध तालुक्याचा आजपर्यंतचा राजकारणाचा व राजकिय व्यक्तिंचा आढावा घेतला तर ना वल्लभशेठ बेनके साहेबांची प्रदीर्घ कारकिर्द राहीली, प्रदीर्घ तर राहीलीच परंतू उल्लेखनियही राहीली, शाश्वत विकासाचं रोल माॅडेल उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. परंतू हे सगळं असताना घरातच राजकारणाचं बाळकडू मिळालेले अतुल बेनके हे पहील्या आमदारकिच्या निवडणूकीत पराभूत झाले, वडीलांचा वारसा, घराणेशाही, या ना अनेक कारणांचा विरोधकांनी भांडवल म्हणून वापर केल्याने २०१४ ला अतुल बेनकेंना पराभवाचा सामना करावा लागला.
आता मात्र वडील आजारी आहेत, दुर्धर आजार झालाय, संघटना वाढवायची, नवी उर्जा तालुक्यात रा काँ पक्षाला द्यायची, संघटनेला बळ देत निवडणूका लढायच्या, तरूणांना बळ द्यायचं, सत्तेतल्या सरकार विरोधात रस्त्यावर उतरायचं, आंदोलनं करायची या सगळ्या बाबतीत अतुल बेनके व बेनके परिवार नव्यानं तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राहीला. मुळातच सामाजिक जाणिवेतून राजकारणात काम करणारे बेनके परिवारातील सर्वजण हे कायम जमीनीवरच राहीलेत कधीही त्यांनी पदामुळं अहंकाराने गर्वाने मुजोरी केली नाही. म्हणूनच की काय पराभव पचवून नम्रपणे जनतेत सेवेत राहीले. कारण पराभव ही गोष्ट बेनके परिवारासाठी नवी नाही.
पण त्यातून फिनिक्स पक्षा प्रमाणं भरारी घेणारे अतुलशेठ हे एकमेवाद्वितीय. कारण त्यांना सातत्यानं साथ मिळाली ती कुटूंबाची, निष्ठावान कार्यकर्त्यांची.कारण मुळात बेनकेंच्याच अंगी निष्ठा ऒतप्रोत भरलेली असताना जमवलेला कार्यकर्त्यांचा संच हीच त्यांची संपत्ती निवडणूकांत कामी आली. शिवाय देशाचे नेते ना शरदचंद्रजी पवार साहेबांवर व पवार घाराण्यावर प्रचंड निष्ठा, प्रेम व तसेच प्रेम पवार साहेबांचे व परिवाराचे देखील बेनके परिवारावर. यामुळेच सातत्यानं विधानसभेला उमेद्वारी बेनकेंना मिळत गेली. व तालुक्यातील आजपर्यंतचा सर्वात तरूण आमदार म्हणून वडीलांनंतर दुसरे आमदार म्हणून अतुल बेनकेंना २०१९ ला जनतेनं संधी दिली.(ना वल्लभशेठ बेनके साहेब ३५ व्या वर्षी आमदार झाले व अतुलशेठ ३९व्या वर्षी) मविआ चं सरकार अस्तित्वात आलं. ना उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले.
ना अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री, कामगार मंत्री, गृहमंत्री झाले.अशी पहाडासारखी मागे उभी असणारी नेते मंडळी पदावर असल्याने विकासकामांचा डोंगर उभा राहीला, निधी कधी कमी पडला नाही. अडीच वर्षात कोट्यावधींचा निधी आणला रखडलेले प्रकल्प मार्गी लागायला सुरवात झाली, त्यात संसदरत्न खासदार डाॅ.अमोलजी कोल्हे यांची खंबीर साथ, व्हीजन घेवून निघालेले खासदार आमदार यांची चुणूक मतदार संघात दिसू लागली. विरोधकांना विनाकारण अंगावर न घेता टिकेला महत्व न देता अभ्यासूपणानं जनतेचे प्रश्न मार्गी लावणं, दर गुरूवारचा जनता दरबार, अधिकाऱ्यांनी तालुका हितासाठी कामातील गती वाढण्याकरीता सतत बैठका घेवून काम करणं. सातत्यानं मंत्रालय पातळीवर कामांचा पाठपुरावा करणं. शिवाय जगावर आलेलं कोरोनाचं महासंकट त्यात स्वत: कोविडग्रस्त असताना तालुक्याची काळजी घेत तालुका सावरता सावरता स्वत:ला अजारातून सावरत एक नवा अध्याय कोविड निर्मुलनासाठी केलेल्या संघर्षाचा लिहीला गेला. तरूण आमदार असणं व कामांना गती देणं हे सुत्र तालुक्यानं अनुभवलं. बिबट सफारी असेल, शिवनेरी परिसर विकास, जलसंपदा विभागाचे प्रकल्प, एम आय टँक, अदिवासी बांधवांचे प्रश्न, जुन्नर शहर नगरपालिका, अष्टविनायकांपैकी दोन तालुक्यातील तिर्थक्षेत्र, ब व क दर्जाची तिर्थक्षेत्रांता विकास, अनेक ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधांसाठीचा निधा मिळवून देणं असेल.
अशी किती किती काम अडीच वर्षात मार्गी लावली व अनेक कामे आता सुरूही आहेत. शेवटी पदाचा वापर प्रतिष्ठेकरता न करता जनहितासाठी करीत कर्तव्याचं भान असणारा तरूण नेता अशीच ऒळख तालुक्यात निर्माण झाली. सध्याच्या राज्याच्या राज्यात कितीही उलथापालथ झाली, विरोधकांच्या सातत्यानं पक्षबदल राजकारणाला तालुक्यातील लोक कंटाळून गेलेत व त्या पार्श्वभूमीवर जनता व पक्ष यांचेशी इमान कायम ठेवत जनसेवेत मग्न असणारा माझा युवा नेता मला अधिक स्थितप्रज्ञ व अधिक प्रगल्भ, परिपक्व झालेला वाटतो. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करून पुढं पावलं टाकणारा युवा आमदार तालुक्याला लाभला. कधीही अनावश्यक बडबड नाही, निष्कारण होवू न शकणाऱ्या कामांच्या वल्गना नाहीत, सभा जिंकायची म्हणून काहीही बोलत लोकांची करमणूक नाही, जे आहे ते सत्य व वास्तव, जे होईल तेच सांगणार, शिवाय काम झाल्यावर त्याची माहीती लोकांना नम्रपणे देणार. निष्कारण अहंकार नाही, प्रसिद्धी नाही. अशा गुणांमुळे हे नेतृत्व जनतेच्या, मनात वेगळं स्थान निर्माण करून अधिक प्रभावशाली बनले आहे. जणू अशा सुजाण व लोभस गुणी अभ्यासू नेतृत्वाच्या शोधात जनता होती असं वाटावं इतपत आमदार अतुलजी बेनके यांचं काम प्रभावीपणे सुरू आहे.
आमचं वय जवळपास सारखं. आम्ही जीवाभावाचे निरपेक्ष वृत्तीनं एकमेकावर प्रेम करणारे मित्र. यामुळं विचारांची नाळ जुळते. कधीही वैयक्तिक हिताची कामं घेवून या आमदार मित्राकडे आम्ही गेलो नाहीत, जे नेलं ते समाजाचं, जनतेचं, वंचित शोषीत घटकाचं. शिवाय त्याला न्याय देण्याचं काम आमदार साहेबांनी केलं. हेच मैत्रीचं प्रतिक. अशा या गुणी नेत्याचा वाढदिवस साजरा होत आहे. रा.काँ पक्ष व संघटनेच्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांचं अभिष्टचिंतन करतो. आपल्या सुविद्यपत्नी सौ गौरीताईंची साथ, बंधू डाॅ अमोलदादा, अमितदादा यांची साथ ही शब्दातीत आहे त्यांचे मी आभार व्यक्त करणार नाही कारण तेच आपल्या यशाचे खरे मानकरी आहेत, कुटूंबीयांचे अव्याहत कष्ट व अनमोल साथ यामुळं हे शक्य झालं आहे. असच आईचं या पुण्यवान माऊलीचं योगदान तर शब्दात मांडणं केवळ अशक्य! कारण पती व मुलगा दोघेही आमदार, पतीच्या म्हणजे एका दैदिप्यमान आमदारकीच्या युगाचा शेवटं व मुलाच्या म्हणजे एका शाश्वत उज्वल भविष्याचा वेध घेणाऱ्या आमदारकीचा उदय यात दिलेलं योगदान मौलिक व अनन्यसाधारण आहे. असाच कौटुंबिक विचारांचा वस्तुपाठ जनतेला सातत्यानं मिळो. आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर भविष्यात सातत्यानं आमदारकी मिळो, राज्याच्या राजकारणात मोठी संधी मिळो, अखंड जनसेवा आपल्याकडून होत राहो हीच मनोकामना.
शब्दांकन :
अॅड विजय भिका कुऱ्हाडे.
कार्याध्यक्ष- पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेल
अध्यक्ष-जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मिडीया सेल, प्रसिद्धी प्रमुख
उपसरपंच-ग्रामपंचायत आळे, ता जुन्नर, जि पुणे.