राजेश्वरी कोठावळे यांनी ग्रामीण भागात खेळाडू घडवले : राणीताई लंके निघोज येथे राज्यस्तरीय हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धा पारनेर प्रतिनिधी : तालुक्...
राजेश्वरी कोठावळे यांनी ग्रामीण भागात खेळाडू घडवले : राणीताई लंके
निघोज येथे राज्यस्तरीय हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धा
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्याच्या सामाजिक राजकीय व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे काम करत असलेल्या राजेश्वरी कोठावळे या महिला सक्षमीकरणासाठी उत्तम काम करत आहेत. तसेच त्यांनी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक महिला व मुलींना प्रशिक्षण देत कराटे, बॉक्सिंग सारख्या क्रीडा प्रकारामध्ये पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडू घडवले आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता असते हे सिद्ध करण्यात राजेश्वरी कोठावळे या यशस्वी ठरल्या आहेत. असे निघोज येथे आयोजित हाफकिडो बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये बोलताना सुपा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या राणीताई निलेश लंके यांनी मत व्यक्त केले.
राज्यस्तरीय पहिली हाफकीडो बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य फेडरेशन कप स्पर्धा पारनेर तालुक्यातील निघोज येथे कपिलेश्वर मंगल कार्यालयामध्ये पार पडली. या स्पर्धेसाठी अहमदनगर, पुणे, नाशिक, मुंबई, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नांदेड, जालना, औरंगाबाद, या ठिकाणावरून खेळाडू सहभागी झाले होते. पारनेर तालुक्यातील निघोज येथे या स्पर्धेचे आयोजन नुकत्याच निवड झालेल्या महाराष्ट्र राज्य हाफ किडो बॉक्सिंग असोसिएशनच्या उपाध्यक्षा व राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सुपा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या राणीताई लंके, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष निघोज ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील वराळ, निघोज गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे,
हाफकीडो बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव ऍड. राज वागदकर, कॉम्पिटिशन डायरेक्टर डॉ. अभिजीत देशमुख, औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष डॉ. कैलास शिवणकर, उपाध्यक्ष उमेश शिंदे, किरण पालकर, हाफ किडो बॉक्सिंगचे खजिनदार संतोष बसवंते, आदी यावेळी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
दरम्यान या स्पर्धेमध्ये एकूण १७५ खेळाडू सहभागी झाले होते. अतिशय अटीतटीच्या लढती या ठिकाणी पाहायला मिळाल्या या स्पर्धेमध्ये एकूण स्वर्ण पदक ४८, रोप्य पदक ४०, व कांस्यपदक ३० या पदकांची खेळाडूंनी लय लूट केली विजयी खेळाडूंना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने राष्ट्रवादी विद्यार्थी मीडिया प्रभारी जितेश सरडे,
अमृता रसाळ, ठकाराम लंके, ज्येष्ठ पत्रकार भास्कर कवाद, ज्ञानेश्वर लंके, आदि उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विजयी खेळाडूंचे यावेळी अभिनंदन केले व ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेश्वरी कोठावळे यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.
खेळाडूंनी पथकांची केली लयलूट...
निघोज येथे भरलेल्या राज्यस्तरीय हाफकिडो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये एकूण स्वर्ण पदक ४८, रोप्य पदक ४० व कांस्यपदक ३० या पदकांची खेळाडूंनी लयलूट केली पारनेर तालुक्यातील ही अनेक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये पदके मिळवत दमदार अशी कामगिरी केली.
निघोजला पहिली राज्यस्तरीय स्पर्धा..
पारनेर तालुक्यातील निघोज येथे हाफकिडो बॉक्सिंग ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पहिल्यांदाच भरली या स्पर्धेमध्ये अनेक लढती थरारक पाहिला मिळाल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेश्वरी कोठावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. निघोज येथील प्रेक्षक वर्ग उपस्थित होता यावेळी खेळाडूंचे त्यांनी कौतुक केले.