कै. भास्करराव मैड यांच्या पुण्यस्मरण निमित्त वृक्षारोपण पारनेर प्रतिनिधी : कै भास्करराव मैड सोनार यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध...
पारनेर प्रतिनिधी :
कै भास्करराव मैड सोनार यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्यांचे चिरंजीव पारनेर तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस तथा मा. उपसरपंच सुपा सागर मैड व अमोल मैड यांनी केला आहे. भास्करराव मैड यांचे हे पंधरावे पुण्यस्मरण साजरे करण्यात येत आहे. त्यांच्या प्रत्येक पुण्यस्मरणानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम समाज बांधिलकी जपत त्यांच्या मुलांकडून नेहमीच राबविले जातात. शाळांच्या माध्यमातून विविध उपक्रमातून त्या विद्यार्थ्यांना नवीन काही शिकण्याचा ते प्रयत्न करत असतात.
मागील काळात त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शाळांमध्ये गोष्टींची पुस्तकं वाटणे, खाऊ वाटप करणे, गावामध्ये लोकांना बसण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बाकडे वाटप करणे, असे विविध उपक्रम नेहमीच राबवले गेले आहेत.
या वृक्षारोपणास महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपा तालुका अध्यक्ष वसंत चेडे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई थोरात, भाजपा जि सरचिटणीस सुनील थोरात, सुपा गावचे सरपंच योगेश रोकडे, प्रताप शिंदे, वसंत पवार सर, बुचडे सर, सुरेंद्र शिंदे, नाजीम शेख, दत्तात्रय टकले, रवी मगर, किरण उदावंत, मनोज सोनार, बाळू शिंदे, सचिन मोहिते, जांभळवाडी शाळेत सर्व शिक्षक व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.