लंके प्रतिष्ठानला भूखंड देण्यास शिवसेना नगरसेवकांचा विरोध! हॉस्पिटल उभारणीसाठी जागेची मागणी आमरण उपोषण करण्याचा सेना नगरसेवकांचा इशारा पारने...
लंके प्रतिष्ठानला भूखंड देण्यास शिवसेना नगरसेवकांचा विरोध!
हॉस्पिटल उभारणीसाठी जागेची मागणी
आमरण उपोषण करण्याचा सेना नगरसेवकांचा इशारा
पारनेर प्रतिनिधी :
हॉस्पिटल उभारणीसाठी शहरातील गट नंबर ९६ मधील ६ हेक्टर २९ आर इतकी जमीन निलेश लंके प्रतिष्ठानला देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी तीव्र विरोध करत नगरपंचायतीच्या विशेष सभेतून सभात्याग केला आहे. मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना दिलेल्या निवेदनावर विद्या गंधाडे, नीता ठुबे, जायदा शेख, शालुबाई ठाणगे यांना निवेदन देत मोठे आव्हान दिले आहे. शिवसेना विरोधानंतर जागा देण्याचा निर्णय होत असल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात यांनी म्हटले आहे, की कोण्या एका प्रतिष्ठानने मौजे पारनेर येथील गट नंबर ९६ मधील ६ हेक्टर २९ आर जागेची वैयक्तिक हॉस्पिटल उभारणीसाठी मागणी केली आहे. सदर जागा ही सरकारी असून, प्रतिष्ठानला देण्यास शिवसेना नगरसेवकांची तीव्र हरकत आहे. सदर जागेचा उपयोग गावातील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालय आजमितीस दुरावस्थेत आहेत. त्यासाठी होऊ शकतो. वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात गावातील जनतेसाठी व्यायाम, फिरण्यासाठी ट्रॅक, बगीचा या अनेक गोष्टी करण्याकरिता उपयोगात आणू शकते. गावाची वाढती लोकसंख्या पाहाता गावाला स्टेडियम, स्विमिंग पूल ट्रॅक तसेच नगरपंचायत हद्दीमध्ये यासारख्या अनेक सुविधा असाव्या लागतात. त्यासाठी भविष्यात या जागेचा उपयोग होऊ शकतो. घरकुल, म्हाडा तसेच इतर शासकीय घरांचे प्रकल्प बसवण्याचे झाल्यास सत्यस्थितीत नगरपंचायतीकडे जागा उपलब्ध नाही. त्यासाठी सदर जागेचा उपयोग होऊ शकतो. गावातील पाणीपुरवठा पाईपलाईन हंगा तलावातून येते, हे सर्वांना ज्ञात आहेत. त्यामुळे भविष्यात जलशुद्धीकरण प्रकल्प बसवण्यासाठीही या जागेचा उपयोग होऊ शकतो. अशी कारणे शिवसेनेच्या नगरसेवकांनी निवेदनमध्ये दिली आहे.
गट नंबर ९६ मधील ६ हेक्टर २९ आर जागा शासकीय मालकीची असून ती कोणत्याही खासगी प्रतिष्ठानला देण्यास आम्हा शिवसेना नगरसेविकांची हरकत आहे. या जागेचा योग्य निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही नगरसेवकांनी दिलेला आहे.